बॉलीवूड गायक उदित नारायण सध्या एका वादग्रस्त व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत. या व्हिडीओमध्ये उदित नारायण लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान काही महिलांच्या गालावर, तर काहींच्या ओठांचं चुंबन घेताना दिसत आहेत. या कॉन्सर्टचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सध्या सर्व स्तरांतून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता उदित यांचे काही जुने व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये उदित नारायण गायिका श्रेया घोषालसह अलका याज्ञिक, करिश्मा कपूर या सेलिब्रिटींना देखील अशाचप्रकारे किस केल्याचं पाहायला मिळत आहे.

उदित नारायण यांचा अलका याज्ञिक यांना गालावर किस करतानाचा व्हिडिओ एका लोकप्रिय कार्यक्रमामधील आहे. उदित यांनी अचानक गालावर किस केल्यामुळे अलका याज्ञिकला काहीसा धक्का बसल्याचं त्यांच्या हावभावांवरून स्पष्टपणे दिसत आहे. याशिवाय दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये त्यांनी करिश्मा कपूरच्या गालाजवळ किसं केल्याचं पाहायला मिळालं.

यापूर्वी बॉलीवूडची सध्याच्या घडीची लोकप्रिय गायिका श्रेया घोषालला सुद्धा उदित नारायण यांनी अशाच प्रकारे किस केलं होतं. मंचावर आल्यावर श्रेयाने उदित नारायण यांची गळाभेट घेतली. तेव्हा उदित यांनी श्रेयाच्या गालावर किस केलं होतं. या सगळ्या व्हिडीओजमुळे सध्या उदित नारायण यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

चाहतीला किस केल्याच्या व्हायरल व्हिडीओवर उदित नारायण यांनी बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं आहे. उदित नारायण म्हणाले, “मी कधी असं काही केलं आहे का ज्यामुळे मला, माझ्या कुटुंबाला किंवा माझ्या देशाला लाज वाटेल? मग आयुष्याच्या या टप्प्यावर मी सर्वकाही साध्य केलेलं असताना आता काहीही का करू माझ्या आणि माझ्या चाहत्यांमध्ये एक खोल, पवित्र आणि अतूट नातं आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही जे पाहिलं, तो माझ्या चाहत्यांचा प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. माझे चाहते माझ्यावर खूप प्रेम करतात. काहीजण हात मिळवतात, कोणी हातावर किस करतं… त्यामुळे अशा गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज नाही.”

दरम्यान, उदित नारायण यांनी आतापर्यंत तेलुगू, कन्नड, तमिळ, बंगाली, सिंधी, ओडिया, भोजपुरी, नेपाळी, मल्याळम आणि आसामी यांसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. आजवर त्यांनी चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले आहेत.