अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या या व्हायरल व्हिडीओमुळे चाहत्यांसह सेलिब्रिटीही नाराजी व्यक्त करत आहेत. तिचा मॉर्फ केलेला हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणावर केंद्रीय मंत्र्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सोमवारी अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. मोदी सरकार इंटरनेट वापरणाऱ्या सर्व डिजिटल नागरीकांची सुरक्षा आणि विश्वास सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. रश्मिकाचा व्हायरल होणारा व्हिडीओ शेअर करत त्यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) एक पोस्ट लिहिली आहे.

Video: रश्मिका मंदानाचा आक्षेपार्ह बनावट व्हिडीओ व्हायरल, अमिताभ बच्चन यांची कायदेशीर कारवाईची मागणी

आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी लिहिलं, “मोदी सरकार इंटरनेट वापरणाऱ्या सर्व डिजिटल नागरिकांची सुरक्षा आणि विश्वास सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे. एप्रिल २०२३ मध्ये अधिसूचित आयटी नियमांनुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी काही गोष्टी बंधनकारक करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कोणत्याही युजरद्वारे कोणतीही चुकीची माहिती पोस्ट केली नाही, याची खात्री करा. तसेच कोणत्याही युजरने किंवा सरकारने याबद्दल रिपोर्ट दिल्यानंतर चुकीची माहिती ३६ तासांत काढून टाकली जाईल याची खात्री करा. जर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने याचे पालन केले नाही तर, नियम ७ लागू होईल आणि प्लॅटफॉर्मविरोधात आयपीसीच्या तरतुदींनुसार पीडित व्यक्ती न्यायालयात जाऊ शकते. याशिवाय डीप फेक हे लेटेस्ट तंत्रज्ञान असून खूप धोकादायक आणि हानीकारक आहे. त्यामुळे चुकीची माहिती पसरवण्याच्या बाबतील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे हे योग्य पद्धतीने हाताळले जाणे आवश्यक आहे.”

दरम्यान, या व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. त्या मुलीचा चेहरा हुबेहुब रश्मिकासारखा आहे. या व्हिडीओमध्ये ती मुलगी लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे आणि तिने अतिशय रीलिव्हिंग ड्रेस घातला आहे. पण हा व्हिडीओ रश्मिकाचा नसून मूळ मॉडेल दुसरीच आहे.

Story img Loader