आर्यन खान लवकरच दिग्दर्शक म्हणून सिनेविश्वात पदार्पण करणार आहे. यासाठी त्याची टीम (क्रू) एकत्र करत आहे. आर्यन खान विद्यार्थी म्हणून कसा होता? याबाबत युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया (USC) स्कूल ऑफ सिनेमॅटिक आर्ट्सच्या डीन आणि प्रोफेसर यांनी माहिती दिली आहे. इथून आर्यन खान पदवीधर झाला आहे.

एलिझाबेथ डेली या यूएससी स्कूल ऑफ सिनेमॅटिक आर्ट्सच्या डीन आहेत आणि डॉ. प्रिया जयकुमार, प्रोफेसर आणि सिनेमा अँड मीडिया स्टडीज विभागाच्या प्रमुख आहेत. या दोघींनी ‘यूएससी इंडिया इनोव्हेशन समिट’मध्ये ‘इंडियन एक्सप्रेस’शी संवाद साधताना आर्यनबद्दलही सांगितलं. याठिकाणी यूएससीचे अध्यक्ष कॅरोल फोल्टदेखील हजर होते.

“माझ्या करिअरमधील सर्वात मोठा फ्लॉप शो शाहरुख खानसह होता”; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “ते अत्यंत…”

आर्यन खान विद्यार्थी म्हणून कसा होता? याबाबत प्रिया जयकुमार म्हणाल्या, “आर्यन शिकत असताना आम्ही त्याला भेटू शकलो नाही कारण जवळपास दीड वर्षे करोना होता. ‘Intro to Cinema’ नावाचा एक वर्ग आहे, तो प्रत्येकाला घ्यावा लागतो. मला माझे पदवीधर विद्यार्थी माहित आहेत जे त्या वर्गासाठी टीए होते कारण ते जवळपास ३५० विद्यार्थी होते आणि दोन विभाग होते आणि त्यांनी आर्यनबरोबर काम केलं आहे. आम्ही त्याच्या वडिलांशी (शाहरुख खान) बोलत होतो. आर्यनचा एक स्ट्रीमिंग शो येत आहे. आर्यनने सांगितलं की तो यूएससी आणि सिनेमॅटिक आर्ट्समध्ये त्याने घालवलेल्या वेळेमुळे खूप प्रभावित झाला होता. आता तो तिथल्या दोन-तीन लोकांसह काम करत आहे.” आर्यनने त्याच्या पदार्पणाच्या शोसाठी युएससीमधील लोकांना सोबत घेतल्याचं प्रिया जयकुमार यांनी सांगितलं.

प्रसिद्ध अभिनेत्याचे २०२३ मधील दोन वादग्रस्त बॉलीवूड सिनेमे, एक ठरला सुपरफ्लॉप, तर दुसऱ्याने कमावले ९१५ कोटी

डीन एलिझाबेथ डेली म्हणाल्या, “त्याच्या वडिलांनी त्याला प्रोफेशनल क्रूची ऑफर दिली पण आर्यन म्हणाला, ‘नाही, नाही, मी माझ्या यूएससी मित्रांना घेऊन येत आहे!’ ज्या वर्षी आम्ही कोलोझियममध्ये सुरुवात केली त्या वर्षी त्याने पदवी प्राप्त केली. हा करोनाचा शेवट होता आणि आम्ही घरात राहू शकत नव्हतो.”

अमिताभ बच्चन यांनी शेअर केला रेखांबरोबरचा ‘तो’ फोटो; म्हणाले, “या फोटोमागे खूप मोठी…”

आर्यन करोनाकाळात पदवीधर झाल्याने आपल्याला त्याच्याशी संवाद साधला न आल्याची खंत प्रिया जयकुमार यांनी व्यक्त केली. “आर्यन कोविड दरम्यान पदवीधर झाला. दुर्दैवाने त्याच्याशी आम्हाला फार संवाद साधता आला नाही,” असं त्या म्हणाल्या.