बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट बनले आहेत, जे त्यातील संवादावर हिट झाले आहे. चित्रपटापेक्षा त्यातील संवादांना खूप टाळ्या मिळाल्या. आजही ते संवाद हिट आहेत. या संवादांनी त्या अभिनेत्यांना एक वेगळी ओळख दिली. जसे, ‘रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते हैं, नाम है शहेनशाह’आता हे कोणत्या अभिनेत्याने म्हटले हे सांगण्याची गरज नाही. १९८८ साली आलेल्या ‘शहेनशाह’ चित्रपटाचा हा डायलॉग ‘अँग्री मॅन’ म्हणजेच अमिताभ बच्चन यांनी आपल्या दमदार आवाजात बोलला तेव्हा चित्रपटगृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. मात्र, हा डायलॉग नेमका लेखकाला सूचला कसा? आणि तो सुरुवातीला कोणत्या अभिनेत्यासाठी लिहिला होता तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो.
हेही वाचा-‘३ इडियट्स’च्या सीक्वलबद्दल करीना कपूरचा मोठा खुलासा; राग व्यक्त करत म्हणाली “माझ्याशिवाय…”
टिन्नू आनंद हे चित्रपट जगतातील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांनीच ‘सात हिंदुस्तानी’ चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांचे नाव सुचवले, त्यानंतर हा अमिताभ यांचा पहिला चित्रपट ठरला. तेव्हापासून टिनू आणि अमिताभ यांच्यात खास नातं आहे. त्यानंतर जेव्हा टिनूने ‘शहेनशाह’ चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याच्या मनात अमिताभचे बच्चन यांचे नाव आले. ‘शहेनशाह’च्या व्यक्तिरेखेसाठी त्यांना दुसरा अभिनेता नको होता.
‘शहेनशाह’साठी दमदार संवादांची गरज होती.
अमिताभ यांनी शहेनशाह चित्रपटात जी व्यक्तिरेखा साकारली आहे, ती कदाचित इतर कोणत्याही अभिनेत्याने साकारली नसेल. चित्रपटात अमिताभ यांची व्यक्तिरेखा अतिशय दमदार असल्याने चित्रपटाचे संवादही त्याच पद्धतीने आवश्यक होते. अशा परिस्थितीत टिनूंचा कोणावर सर्वाधिक विश्वास असेल तर ते म्हणजे त्यांचे वडील इंद्रराज आनंद. इंद्रराज हे प्रसिद्ध पडदा आणि संवाद लेखक होते.
हेही वाचा- Video : गाडीत बसलेल्या प्रसिद्ध क्रिकेटपटूला राखी सावंतने ओळखलंच नाही, म्हणाली “कोण तो?”
इंद्र राज यांनी अमिताभसाठी ‘रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते हैं, नाम है शहेनशाह’ हा सिग्नेचर डायलॉग लिहिला होता. हा संवाद टिनूने ऐकल्यावर त्यांना जरा विचित्र वाटले. आपल्या एका मुलाखतीत टिनू यांनी सांगितले होते, ‘मी माझ्या वडिलांना म्हणाले, हे काही विचित्र वाटत आहे. हिरोला हा डायलॉग शोभेल का? यावर वडिलांनी विचारले हिरो कोण घेतला आहे? मी म्हणालो ‘अमिताभ बच्चन’ मग ते म्हणाले की हिरो हा फिल्म इंडस्ट्रीचा सिंह असतो आणि सिंहाला मटण खायला दिले जाते. म्हणूनच मला माहित आहे की ज्याला हा डायलॉग दिला जात आहे, तो त्याला शोभेल. अमिताभ बच्चन यांनी बोललेला हा डायलॉगने शहेशाहची भूमिका आजरामर केली आणि आजही हा डायलॉग लोकांच्या ओठावर आहे.