‘मैने प्यार किया’मध्ये दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी सलमान खान आणि भाग्यश्री यांना प्रमुख स्टार्स म्हणून लॉन्च केले. सलमानने याआधी ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटात छोट्या भूमिकेत काम केले होते, पण ‘मैने प्यार किया’ हा त्याचा प्रमुख नायक म्हणून पहिला चित्रपट होता. या चित्रपटात त्याच्या बरोबर प्रमुख अभिनेत्रीची निवड करताना दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी अनेक अभिनेत्रींची ऑडिशन घेतली होती. अभिनेत्री उपासना सिंग यांनी सुद्धा या चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उपासनाने सांगितले की, तिला या चित्रपटासाठी निवडले गेले नाही कारण ती सलमानपेक्षा उंच होती. तिने आठवण सांगितली की, सुरुवातीच्या ऑडिशननंतर दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी तिला भूमिका दिली होती, पण त्यांचे वडील राजकुमार बडजात्या यांना ती सुमनच्या भूमिकेसाठी योग्य वाटली नाही.

हेही वाचा…३५० कोटींचे बजेट अन् कमावले फक्त…; बायकोचा सिनेमा ब्लॉकबस्टर, तर नवऱ्याचा चित्रपट ठरला सुपरफ्लॉप

सिद्धार्थ कननबरोबरच्या संभाषणात, उपासनाने सांगितले की, तिने ‘मैने प्यार किया’ चित्रपटात भाग्यश्रीच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. ती म्हणाली, “मी जेव्हा पहिल्यांदा मुंबईला आले, तेव्हा सूरजशी यांच्याशी माझी भेट झाली. त्यांनी मला चित्रपटाची, माझ्या भूमिकेची पूर्ण माहिती दिली आणि माझी या भूमिकेसाठी निवड केली. त्यानंतर त्यांनी सांगितलं की, ‘उद्या माझ्या वडिलांना भेटा, पण मला तुम्ही या भूमिकेसाठी आवडला आहात.’ दुसऱ्या दिवशी मी त्यांच्या वडिलांना भेटले आणि त्यांनी मला नकार दिला. मात्र, ते खूप चांगले लोक असल्याने त्यांनी मला तोंडावर स्पष्टपणे ‘नकार’ दिला नाही, पण त्यांनी मला पुन्हा बोलावलं देखील नाही,” असे उपासनाने नमूद केले.

उपासनाने यानंतर ‘मैं प्रेम की दिवानी हूँ’ या चित्रपटात राजश्री प्रॉडक्शन्सबरोबर काम केले. तेव्हा, सेटवर राजकुमार बडजात्यांनी खुलासा केला की, उपासना ही ‘मैने प्यार किया’साठी सुमनच्या भूमिकेसाठी त्यांची पहिली पसंती होती. ती म्हणाली, ” राजकुमार बडजात्या’मैं प्रेम की दिवानी हूँ’च्या सेटवर म्हणाले, तुम्हाला माहित आहे का?, ‘मैने प्यार किया’साठी आमची पहिली पसंती कोण होती?’ करीना, अभिषेक आणि हृतिक सगळे तिथं होते. मी कधीच कोणाला हे सांगितलं नव्हतं कारण मला ही भूमिका मिळाली नव्हती. मग ते म्हणाले, ‘ती उपासना होती.’ सगळे आश्चर्यचकित झाले. मी म्हटलं, ‘पण तुमच्यामुळे मला भूमिका मिळाली नाही.’ ते म्हणाले, ‘जर मी तुला निवडले असते, तर कदाचित भाग्यश्रीप्रमाणे तूही चित्रपटसृष्टी सोडली असतीस.'”

हेही वाचा…प्रसिद्ध बॉलीवूड गायकाने गुपचूप उरकलं लग्न; पत्नी आहे वयाने मोठी, विवाहसोहळ्याचे फोटो आले समोर

उपासनाने नंतर सांगितले की, तिने राजकुमार बडजात्यांना या चित्रपटासाठी तिची निवड का केली गेली नाही यामागील खर कारण विचारलं. ती म्हणाली, ” राजकुमार बडजात्या यांनी मला सांगितलं, की ते म्हणाले, ‘मी सबब सांगत नाही, पण तू सलमानपेक्षा उंच होतीस.’ मला हेच सांगण्यात आलं. त्यांना सलमानपेक्षा बऱ्यापैकी लहान उंचीची अभिनेत्री हवी होती, म्हणूनच त्यांनी मला निवडलं नाही.” असे तिने सांगितले. ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट प्रचंड हिट ठरला आणि त्याच्या प्रदर्शना नंतर सलमान आणि भाग्यश्री हे सुपरस्टार बनले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upasana singh was first chosen for maine pyar kiya but lost the role for being taller than salman khan psg