बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात जया बच्चन आणि त्यांची नात नव्या नवेली नंदा एअरपोर्टवर जाताना दिसत होत्या. त्यावेळी काही फोटोग्राफर्सनी त्यांचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला पण त्याचवेळी एका फोटोग्राफरला ठेच लागून पडता पडता वाचला. यावर जया बच्चन यांनी त्याला तो ठीक आहे की नाही हे विचारण्याऐवजी जे झालं ते बरं झालं असं त्या म्हणाल्या. तो पुन्हा पडावा असं त्यांना वाटत होतं. जया बच्चन यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आता उर्फी जावेदनंही या व्हिडीओवर संताप व्यक्त केला आहे.

उर्फी जावेदनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर जया बच्चन यांचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना संदेश दिला आहे. जया बच्चन यांच्यासारखं कधीच होऊ नका. उर्फी जावेदने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, “त्यांनी खरंच म्हटलं का की तू पुन्हा पडायला हवास. कृपया तुम्ही कोणीच त्यांच्यासारखे होऊ नका. मी आशा करते की सर्वजण नेहमीच भक्कमपणे उभे राहू दे. मग ते कॅमेराच्या समोर असो किंवा कॅमेराच्या मागे. तुम्ही मोठ्या आहात म्हणून लोक तुमचा आदर करत नाहीत किंवा त्यांच्यापेक्षा जास्त शक्तीशाली आहात म्हणून लोक तुम्हाला मान देत नाहीत. तर तुम्ही त्यांच्याशी कसे वागता किंवा किती चांगले वागता यावरून लोक तुमचा आदर करतात.”

आणखी वाचा- Video : …अन् झोपाळ्यावरून धपकन खाली पडली उर्फी जावेद; व्हिडीओ व्हायरल

urfi javed instagram story

याशिवाय उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आणखी एक नोट शेअर केली आहे. ज्यात तिने सार्वजनिक मुद्द्यांवर आपलं मत मांडण्याविषयी भाष्य केलं आहे. तिने लिहिलं, “मला माझे विचार मांडायला आवडत नाही. पण कधी कधी मी स्वतःवर संयम ठेवू शकत नाही. अर्थात मला माहीत आहे की मी जे करतेय त्याने मला कामाच्या संधीही गमवाव्या लागतील. पण गप्प राहणं आता शक्य नाही. मला वाटतं जे मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे नसतात त्यावर बोलणं आपण टाळतो. यावरून तुम्ही कसे आहात हे समजतं.”

आणखी वाचा- “बिग बी कसे आणि तुम्ही…”, जया बच्चन यांच्यावर नेटकरी नाराज, जाणून घ्या नेमकं काय घडलं

दरम्यान उर्फी जावेद नेहमीच तिच्या अतरंगी फॅशनमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. ती जेव्हाही घरातून बाहेर पडते तेव्हा फोटोग्राफर्स तिच्या अवती-भोवती असलेले दिसतात. अशात ती नेहमीच सर्वांशी प्रेमाने बोलताना आणि त्यांची विचारपूस करताना दिसली आहे. सणासुदीच्या दिवशी ती फोटोग्राफर्सना मिठाई वाटतानाही दिसली आहे. याशिवाय तिने तिचा वाढदिवसही सर्वांसोबत साजरा केला होता.