उर्फी जावेद तिच्या बोल्ड आउटफिट्स आणि अनोख्या फॅशनमुळे चांगलीच चर्चेत असते. ती जवळजवळ दररोज तिच्या ड्रेसिंग स्टाईलने चाहत्यांना आश्चर्यचकित करत असते. बॉलिवूडची बेबो करीना कपूर देखील उर्फीच्या फॅशनची फॅन झाली आणि काही दिवसांपूर्वी तिने उर्फीचे तोंडभरून कौतुकही केले होते. त्याचवेळी एका मुलाखतीदरम्यान रणबीर कपूरने उर्फीच्या फॅशन सेन्सला वाईट निवड (बॅड टेस्ट) असे वर्णन केले होते.

रणबीर कपूरच्या या वक्तव्यावर आता उर्फीनेही प्रतिक्रिया दिली आहे. ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत करीना कपूरने कौतुक केल्यावर तिची प्रतिक्रिया काय होती याबद्दल उर्फी म्हणाली, “माझे भान हरपले होते. सुरुवातीला माझा यावर विश्वासच बसत नव्हता, मला वाटले की हा एक प्रकारचा विनोद आहे. तिने काहीतरी थट्टा केली असेल आणि हे लोक माझी टिंगल करत आहेत की त्यांनी स्तुती केली, पण जेव्हा मी व्हिडिओ पाहिला तेव्हा मला जाणवले की मी आज काहीतरी साध्य केलं आहे की खुद्द करीना कपूर माझं कौतुक करत आहे.”

Santosh Juvekar
काही चित्रपट पैशांसाठी करावे लागतात; प्रसिद्ध अभिनेता म्हणाला, “मी कलाकार असलो तरी….”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
amruta Khanvilkar
‘३ इडियट्स’मध्ये करीना कपूर ऐवजी ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची झाली होती निवड; रोहन मापुस्कर म्हणाले, “मोठे स्टार…”
shweta kharat
“प्रत्येक माणसाबद्दल…”, ‘पारू’ फेम श्वेता खरातने सांगितला हर्षदा खानविलकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाली…
santosh juvekar reveals his experience to working with vicky kaushal in chhaava
“माझी सुट्टी होती, विकीने अचानक सेटवर बोलावून घेतलं अन्…”, संतोष जुवेकरने सांगितला ‘छावा’च्या सेटवरचा अनुभव, म्हणाला…
Shahid Kapoor Mira Rajput
“तू ‘जब वी मेट’मधील आदित्य सारखा नाही…”; पत्नी मिरा राजपुतची तक्रार, शाहिद कपूर म्हणाला, “आनंदी हो…”
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”

आणखी वाचा : “पूल पार्टी, मद्यपान अन् जबरदस्ती केलं…” नेटफ्लिक्सच्या ‘डेटिंग शो’मधील साक्षी गुप्ताचा स्पर्धकावर गंभीर आरोप

याशिवाय उर्फी जावेदने रणबीर कपूरच्या कमेंटवर प्रतिक्रियाही दिली. ती म्हणाली, “रणबीर कपूरचे स्टेटमेंट ऐकून मला वाईट वाटले, पण जेव्हा करीना कपूरने प्रशंसा केली तेव्हा मला वाटले की रणबीर कपूरला कोण विचारणार आहे. करिनाने केले माझे कौतुक, आता रणबीरची काय लायकी?” रणबीरने करीना कपूर खानच्या ‘व्हॉट वुमन वॉन्ट’ या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. या टॉक शोमध्ये एका खेळादरम्यान रणबीर कपूरने मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेदवर टीका केली होती.

आणखी वाचा : ठरलं! तब्बल ६ महिन्यांनंतर ‘विक्रम वेधा’ व ‘भेडिया’ होणार ओटीटीवर रिलीज; वाचा कुठे पाहता येणार?

उर्फीने गेल्या काही दिवसांत बॉलिवूड सेलिब्रिटीजचं लक्ष वेधून घेतलं आहे. बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रिटीजनी उर्फीच्या हिंमतीची दादही दिली आहे. तर रणबीरचा ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची कमाई केली आहे. याबरोबरच रणबीरच्या आगामी ‘अॅनिमल’ या चित्रपटाची सगळेच आतुरतेने वाट बघत आहेत.

Story img Loader