उर्फी जावेद तिच्या चित्रविचित्र आऊटफिट्स आणि अनोख्या फॅशनमुळे चांगलीच चर्चेत असते. उर्फी दररोज तिच्या ड्रेसिंग स्टाईलने चाहत्यांना आश्चर्यचकित करत असते. बॉलिवूडची बेबो करीना कपूर देखील उर्फीच्या फॅशनची फॅन झाली आणि काही दिवसांपूर्वी तिने उर्फीचे तोंडभरून कौतुकही केले होते. पण एका मुलाखतीदरम्यान रणबीर कपूरने उर्फीच्या फॅशन सेन्सचे वाईट निवड (बॅड टेस्ट) असे वर्णन केले होते.

रणबीर कपूरच्या या वक्तव्यावर नुकतंच उर्फीनेही प्रतिक्रिया दिली. ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत उर्फीने करीनाने केलेल्या कौतुकाबद्दल तिचे आभार मानले पण याच मुलाखतीमध्ये रणबीरच्या वक्तव्याबद्दल बोलताना उर्फी काहीशी नाराज होती. याविषयी बोलताना उर्फी म्हणाली होती, की “खड्ड्यात गेला रणबीर कपूर, माझं करीना कपूरने कौतुक केलं तेच पुरेसं आहे माझ्यासाठी, करीनासमोर रणबीरची काय लायकी.”

Khushi Kapoor
“माझा आत्मविश्वास…”, खुशी कपूरची तिच्या सौंदर्यावरून उडवली जात होती खिल्ली; किस्सा सांगत म्हणाली…
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Chhagan Bhujbal
“तेलगी प्रकरणात माझं…”, दोन दशकानंतर भुजबळांनी मनातली खदखद व्यक्त केली; मंत्रिपदाच्या राजीनाम्याबद्दल म्हणाले…
salman khan did not select in vivah movie
‘विवाह’मध्ये सलमान खानऐवजी शाहिद कपूरला का घेतलं होतं? दिग्दर्शक म्हणाले, “त्या भूमिकेसाठी निरागसपणा…”
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Jos Buttler Creates History in T20I Scored Most Runs in India by Visiting Batter 556 Runs IND vs ENG
IND vs ENG: जोस बटलरची ऐतिहासिक कामगिरी, भारतात टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज
Abhijeet Chavan
“मेल्या, चप्पल तरी काढ”, नेटकऱ्याच्या कमेंटवर अभिजीत चव्हाण यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “तीच तर…”
shahid kapoor on where would be geet aditya jab we met (1)
“घटस्फोट झाला असता”, करीना कपूर संदर्भातील ‘त्या’ व्यक्तीच्या वक्तव्यावर शाहिद कपूर म्हणाला, “तिला कोण सहन करेल…”

आणखी वाचा : “त्याची काय लायकी…” उर्फी जावेदच्या फॅशनबद्दल भाष्य करणाऱ्या रणबीर कपूरला अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर

आपल्या याच वक्तव्यावर उर्फीने स्पष्टीकरण दिलेलं आहे. तिने तसं काहीच बोललं नसल्याचं स्पष्ट केलं आहे. एका बातमीचा फोटो उर्फीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ती म्हणते, “मी असं काहीच म्हंटलं नाही, मी केवळ मस्करी करत होते की करीनाने कौतुक केलंय तर आता काय रणबीर गेला खड्ड्यात. हे मी अत्यंत मस्करीत, उपरोधीकतेने बोलले आहे. रणबीरने जे काही मत मांडलं आहे तो त्याचा दृष्टिकोन आहे. त्यात काहीच द्वेषभावना नाही. खरोखरच रणबीरची लायकी काढण्याचा किंवा त्याल खड्ड्यात जा असं म्हणण्याचा माझा हेतु नव्हता.”

उर्फी जावेद पोस्ट
उर्फी जावेद पोस्ट

आणखी वाचा : ‘टाइम’च्या १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत शाहरुख खान प्रथम; पण नेटकरी करतायत मासिकाला ट्रोल

रणबीरने करीना कपूर खानच्या ‘व्हॉट वुमन वॉन्ट’ या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. या टॉक शोमध्ये एका खेळादरम्यान रणबीर कपूरने मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेदवर टीका केली होती. उर्फीने गेल्या काही दिवसांत बॉलिवूड सेलिब्रिटीजचं लक्ष वेधून घेतलं आहे. बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रिटीजनी उर्फीच्या हिंमतीची दादही दिली आहे.

Story img Loader