सध्या कान्स फिल्म फेस्टिवलची सर्वत्र चर्चा आहे. स्पेनमध्ये हा फिल्म फेस्टिवल दिमाखात रंगत आहे. या फिल्म फेस्टिवलमध्ये अनेक बॉलीवूड अभिनेत्रींनी त्यांची झलक दाखवली. या प्रत्येकीने या फिल्म फेस्टिवलदरम्यान केलेल्या हटके स्टाइलने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. काही नाही त्यांच्या स्टाइलचं कौतुक केलं तर काही नाही त्यांना ट्रोल केलं. विवेक अग्निहोत्री यांनी ‘कान्स’ फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय बच्चनला तिचा ड्रेस नीट करण्यास मदत करणाऱ्या ‘पोशाख गुलाम’ म्हणजेच ‘कॉस्च्युम स्लेव्स’वर ट्वीट करत टीका केली. पण विवेक अग्निहोत्री यांनी केलेली ही टीका उर्फीला फारच खटकली आहे.

उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे कायमच चर्चेत असते. उर्फी सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्याबद्दलचे अपडेट्स शेअर करत असते. जवळपास रोजच ती हटके कपड्यांमध्ये दिसते. तिची अतरंगी फॅशन नेहमीच चर्चेचा विषय ठरते. पण आता विवेक अग्निहोत्रेंनी ऐश्वर्या रायला तिचा ड्रेस नीट करण्यास मदत करणाऱ्या व्यक्तीवर केलेल्या टीकेवर उर्फी चांगलीच चिडली.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Shabana Azmi Javed Akhtar
शबाना आझमींना चेटकिणीच्या रुपात पाहून जावेद अख्तर यांनी दिलेली ‘अशी’ प्रतिक्रिया, म्हणालेले, “सगळा मेकअप…”

आणखी वाचा : Video : काय सांगता! उर्फी जावेदने गरजूंना वाटल्या ५०० च्या नोटा, व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित, म्हणाले…

उर्फीने ट्वीट करत थेट विवेक अग्निहोत्री यांच्या फॅशन सेन्सवर प्रश्न उपस्थित केला. विवेक अग्निहोत्री यांचे ट्वीट रिट्वीट करत तिने लिहिलं, “मला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही कोणत्या फॅशन स्कूलमधून पदवी घेतली? तुम्हाला पाहून असं वाटतं की तुम्हाला फॅशनची खूपच जाण आहे. तुम्ही एखादा फॅशन चित्रपट तयार केला पाहिजेत.”

हेही वाचा : उर्फी जावेदने खरेदी केली नवी कोरी आलिशान गाडी; किंमती ऐवजी ‘हे’ कारण वाचलंत तर व्हाल थक्क

आता उर्फीचं हे ट्वीट खूप चर्चेत आलं असून यावर कमेंट करत नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. यावर कमेंट करत काहींनी उर्फीलाच ट्रोल केलं, तर काहींनी उर्फीची बाजू घेत विवेक अग्निहोत्रींच्या बोलण्यावर आक्षेप घेतला आहे.

Story img Loader