राजकुमार राव, नुशरत भरुचा यांचा ‘लव्ह सेक्स और धोका’ हा चित्रपट चांगलाच गाजला. नव्या पिढीच्या प्रेमाची एक विचित्र व्याख्या अन् त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या यावर बेतलेला हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला. आता याच्या सीक्वलची म्हणजेच ‘लव्ह सेक्स और धोखा २’ ची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या सीक्वलमध्ये इंटरनेटच्या विश्वात प्रेम आणि नातेसंबंध यावर भाष्य करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. या चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे ती म्हणजे या चित्रपटातून इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद मोठ्या पडद्यावर पदार्पण करताना दिसणार आहे.
आपल्या चित्रविचित्र फॅशनमुळे कायम लाईमलाइटमध्ये असणारी उर्फी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. उर्फी तिच्या पेहरावामुळे कायम चर्चेत असते. तिच्यावर प्रचंड टीकादेखील होते, परंतु ती अतिशय बेधडकपणे या सगळ्याचा सामना करून तिला जे हवं आहे तेच ती करते. ‘बिग बॉस ओटीटी’मुळे अधिक लोकप्रिय झालेल्या उर्फीने याआधीही अभिनयात नशीब आजमावलं आहे. टेलिव्हिजनवरील बऱ्याच मालिकांमध्ये उर्फी एका आदर्श सूनेच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली आहे.
आणखी वाचा : अमिताभ बच्चन यांचा शेजारी व्हायचंय? मग मोजावे लागतील ‘इतके’ कोटी, नेमकं प्रकरण जाणून घ्या
मीडिया रीपोर्टनुसार ‘लव्ह सेक्स और धोका २’ या चित्रपटाचे कथानक हे उर्फीच्या व्यक्तिमत्त्वाशी मिळते जुळते असल्याचं स्पष्ट होत आहे. दीबाकर बॅनर्जीच या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून एकता कपूरची प्रोडक्शन कंपनी बालाजी टेलीफिल्म्सच याची निर्मिती करणार आहे. याआधी या चित्रपटात तुषार कपूर आणि मौनी रॉय हे दोघे झळकणार होते, पण या दोघांनी यासाठी नकार दिल्याचं सांगितलं जात आहे.
इतकंच नव्हे तर हा चित्रपट १९ एप्रिल २०२४ रोजी प्रदर्शित होणार असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. उर्फी जावेद याआधी ‘ए मेरे हमसफर’, ‘चंद्र नंदिनी’, ‘मेरी दुर्गा’, ‘साथ फेरो की हेरा फेरी’, ‘बेपना’, ‘डायन’सारख्या अनेक टेलिव्हिजन मालिकांमध्ये दिसली आहे. याबरोबरच तिने ‘रिश्ता क्या कहलाता है’, ‘बडे भैया’सारख्या मालिकांमध्येही काम केलं आहे. आजकाल उर्फी केवळ पापाराझींसमोरच्या तिच्या चित्र-विचित्र आणि ग्लॅमरस फॅशनसाठी ओळखली जाते.