कायम चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. तिच्या हटके स्टाइलमुळे ती नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. पण होणाऱ्या टीकेकडे लक्ष न देता ती तिच्या पद्धतीने तिचं आयुष्य जगताना दिसते. आता तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेली एक स्टोरी खूप चर्चेत आली आहे.

उर्फी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. याचबरोबर तिला खटकणाऱ्या गोष्टींबाबतही ती बिनधास्तपणे व्यक्त होत असते. आता माधुरी दीक्षित आणि एका कार्यक्रमाच्या आयोजकांवर तिने जोरदार टीका केली आहे.

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
prasad jawade reaction on amruta deshmukh enter in maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुख ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करणार असल्याचं समजताच नवऱ्याला झाला आनंद, अभिनेत्री म्हणाली…
tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises husband yogesh sambherao
दोन महिन्यांचा मुलगा, चित्रपटाची ऑफर आली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “नवऱ्याने…”
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी

आणखी वाचा : रितेश-जिनिलीयाच्या ‘वेड’ चित्रपटातील गाण्याची माधुरी दीक्षितला भुरळ, फोटो शेअर करत म्हणाली, “जेव्हा आपल्या…”

उर्फी जावेदबरोबर काल एक वेगळीच घटना घडली. नेमकं काय झालं हे तिने सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट करत सांगितलं. या स्टोरीमध्ये तिने माधुरी दीक्षितचा एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं, “या कार्यक्रमाबद्दल एक विनोदी बाब म्हणजे – त्यांनी माझ्या टीमच्या मार्फत मला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं, मी त्यांचं निमंत्रण स्वीकारलं, त्या दिवशीचे माझे सगळे प्लॅन्स रद्द केले, कार्यक्रमासाठी कपडे जमवले आणि शेवटच्या घडीला त्यांनी मला सांगितलं की, या कार्यक्रमासाठी आता मी निमंत्रित नाहीये. यामागचं कारण जेव्हा मी त्यांना विचारलं तेव्हा मी माधुरी दीक्षितच्या गेस्ट लिस्टमध्ये नाही, असं ते म्हणाले. हे अत्यंत विचित्र कारण आहे.”

हेही वाचा : माधुरी दीक्षितला डावलून ‘परदेस’ चित्रपटासाठी सुभाष घईंनी केली होती महिमा चौधरीची निवड, कारण…

पुढे तिने लिहिलं, “मी कुठेही जाण्यासाठी उत्सुक झाले नव्हते. पण एखाद्याला निमंत्रित केल्यानंतर ऐन वेळी त्याला ‘तू येऊ नकोस’ म्हणून सांगायचं म्हणजे…” इन्स्टाग्राम स्टोरीबरोबरच तिने ही पोस्ट ट्विटरला देखील शेअर केली. आता तिच्या या पोस्टवर नेटकरी कमेंट करत आयोजक आणि माधुरी दीक्षितच्या या वागण्यावर टीका करत आहेत.

Story img Loader