नेहमीच आपल्या कपड्यांमुळे चर्चेत राहणारी उर्फी जावेद आता तिच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. उर्फी बरोबर एक धक्कादायक प्रसंग घडला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत उर्फीने याची माहिती दिली. उर्फी जावेदने एका कॅब ड्रायव्हरच्या विरोधात तक्रार केली आहे. दिल्लीमध्ये असताना उर्फीने उबर कॅब बुक केली होती पण याबाबत तिचा अनुभव खूपच धक्कादायक होता असं तिने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

उर्फी जावेदने ट्विटरवर कॅब बुकिंगचा एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे. या फोटोसह तिने ट्वीटमध्ये लिहिलं, “माझा उबर सर्व्हिसबरोबरचा सर्वात वाईट अनुभव आहे. मी दिल्लीत होते आणि ६ तसांसाठी मी एक कॅब बुक केली होती. विमानतळावरून परतत असताना मी दुपारी जेवण्यासाठी गाडी थांबवली. यावेळी त्या कॅबचा ड्रायव्हर माझं सामान घेऊन पळून गेला. त्यानंतर माझ्या एका मित्राने मला मदत केली आणि तो ड्रायव्हर कसाबसा परत आला. पण त्यावेळी तो नशेत होता.”

Viral video shows car hitting woman distracted by phone the Internet is stunned by what she does next
फोनमध्ये पाहत रस्ता ओलांडते महिला, कारने दिली जोरदार टक्कर अन्…, थरारक अपघाताचा Video Viral
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
yavatmal persons set fire to Bipin Choudharys car on Friday midnight
खळबळजनक! पेट्रोल टाकून उमेदवाराचे वाहनच पेटविले…
young girl fight with ola auto viral video
“ये आदमी पागल है”, तरुणीने रिक्षाचालकाला केली शिवीगाळ अन्…, पुढे जे घडलं ते खतरनाक, पाहा VIDEO
pune four pistols and two bikes seized
कोंढव्यात तिघांकडून चार पिस्तुले, दोन दुचाकी जप्त
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
panvel toll collector killed by speeding truck in Roadpali on Saturday
भरधाव ट्रकच्या धडकेत टोलवसुली कर्मचारी ठार 

आणखी वाचा-‘खतरों के खिलाडी १३’मध्ये झळकणार उर्फी जावेद? कार्यक्रमाच्या टीमकडून विचारणा झाल्यानंतर अभिनेत्रीने दिलं ‘हे’ उत्तर

उर्फी जावेदने तिच्या दुसऱ्या एका ट्वीटमध्ये लिहिलं, “तो माणूस स्वतःहून व्यवस्थित चालूही शकत नव्हता. अगदी सुरुवातीला त्याने लोकशनबद्दल खोटं सांगितलं. तो म्हणाला की तो पार्किंगमध्ये आहे. यानंतर माझ्या मित्राने त्याला सतत कॉल्स केले. तो त्याच्या लोकेशनवरून परत येण्यास तयार नव्हता.”

urfi javed instagram story

आणखी वाचा- जावेद अख्तर यांच्या २६/११ संबंधी वक्तव्यावर कंगनाची प्रतिक्रिया; म्हणाली, “घरात घुसून…”

याशिवाय उर्फीने तिच्या इन्स्टाग्रामवरही एक स्टोरी शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये तिने म्हटलंय, “उबर कृपया काहीतरी करा. हे महिलांच्या सुरक्षेच्या विरोधात आहे. माझा अनुभव खूपच वाईट होता. सर्वात आधी तर ड्रायव्हर माझं सामान घेऊन पळून गेला आणि मग दोन तासांनंतर नशेत असलेल्या अवस्थेत परत आला.” दरम्यान उर्फीच्या ट्वीटवर उबर इंडियाने प्रतिक्रिया दिली असून संबंधित ड्रायव्हरच्या वागणुकीसाठी त्यांनी उर्फीची माफी मागितली आहे.