बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी व त्याच्या पत्नीमधील वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दीन वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पत्नी आलियाने नवाजुद्दीनवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. नवाजुद्दीन व त्याच्या कुटुंबियावर छळ केल्याचा आरोप आलियाने केला आहे. त्याबरोबरच नवाजुद्दीनवर बलात्कार आणि प्रसिद्धी व पैशाचा गैरवापर करत असल्याचा आरोपही आलियाने केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुलांसह नवाजुद्दीनने त्याच्या घरातून रात्री ११:३० वाजता बाहेर काढल्याचं आलिया म्हणाली होती. नवाजुद्दीनच्या बंगल्याच्या गेटवरुनच आलियाने मध्यरात्री व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये नवाजुद्दीनची मुलगी रडताना दिसत होती. आलिया व तिच्या मुलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडिया सेन्सेशन असलेल्या उर्फी जावेदने शेअर केला आहे. उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आलियाचा व्हिडीओ शेअर करत नवाजुद्दीन सिद्दीकी प्रकरणावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

हेही वाचा>> सोशल मीडिया स्टार असलेल्या महिला पोलिसाला छाप्यानंतर अटक; राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेत झाली होती सहभागी, नेमकं प्रकरण काय?

“याबाबत मला काहीच बोलायचं नाही. हे पाहून माझं हृदय तुटलं आहे. यामुळे मला माझ्याबरोबर घडलेल्या प्रसंगांची आठवण झाली. मी केवळ सहानुभूती देऊ शकते”, असं उर्फीने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं आहे. उर्फी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समाजातील अनेक घडामोडींवर उर्फी स्पष्टपणे तिचं मत मांडताना दिसते.

हेही वाचा>> ‘इंकलाब जिंदाबाद’, महात्मा गांधींचा फोटो अन्…; स्वरा भास्कर व फहाद अहमदच्या लग्नाची पत्रिका व्हायरल

हेही वाचा>> होळीत बांबूच्या झाडाची लाकडे जाळल्याने शिल्पा शेट्टीला नेटकऱ्यांनी सुनावलं, म्हणाले “हिंदू धर्मात…”

दरम्यान, पत्नी आलियाने केलेल्या आरोपांवर नवाजुद्दीनने मौन सोडत त्याची बाजू मांडली आहे. नवाजुद्दीनने त्याच्या सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर केली आहे. “आतापर्यंत शांत राहिलो म्हणून मी वाईट माणूस आहे अशी माझ्यावर टीका करण्यात आली. हा तमाशा माझ्या मुलांना कधीतरी कळणारच या कारणामुळे मी शांत होता. सोशल मीडिया, प्रसारमाध्यमं आणि काही लोकं माझ्या खराब प्रतिमेचा आनंद घेत आहेत. मी तुम्हा सगळ्यांना काही गोष्टी सांगू इच्छितो. गेल्या काही वर्षांपासून मी व आलिया एकत्र राहत नाही. आमचा आधीच घटस्फोट झाला आहे. पण आम्ही मुलांसाठी समजुतदारपणाने वागलो”, असं नवाजुद्दीनने म्हटलं आहे. याशिवाय प्रत्येक महिन्याला आलियाला १० लाख रुपये देत असल्याचंही त्याने सांगितलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urfi javed shows sympathy towards nawazuddin siddiqui wife aaliya and their childrens after he didnt allowed to enter house kak