काही दिवसांपूर्वी निर्माता आदित्य चोप्रा यांनी त्यांच्या मनातील खंत व्यक्त केली होती. त्यांनी भाऊ उदय चोप्राला स्टार बनवू न शकण्याबद्दल विधान केलं होतं. “नेपोटिझममुळे मी माझ्या भावाला स्टार बनू शकलो नाही. तो एका मोठ्या चित्रपट निर्मात्यांचा मुलगा असूनही बॉलिवूडमध्ये ठसा उमटवू शकला नाही,” असं वक्तव्य आदित्य चोप्रा यांनी नेपोटिझमवर बोलताना केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर उर्फी जावेदने प्रतिक्रिया दिली आहे.
Video: “हे असले चाळे…” ‘त्या’ व्हिडीओमुळे ‘फँड्री’ फेम राजेश्वरी खरात ट्रोल
उर्फीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत आदित्य चोप्रांवर टीका केली आहे. तिने लिहिलं “या विधानातील अज्ञानाचा मला जास्त त्रास होत आहे. नेपोटिझम यशाबद्दल नाही तर संधींबद्दल आहे. उदय चोप्रा ना दिसायला चांगला आहे आणि ना चांगला अभिनेता आहे. त्याचे चित्रपट पडद्यावर फ्लॉप झाले, पण तरीही त्याला काम मिळत राहिले. उदयच्या नावापुढे चोप्राऐवजी चौहान असते तर त्याचा पहिला चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्याला संधीच मिळाली नसती. तुम्ही सर्वजण अशा नेपोटिझमचं समर्थन कराल का?” असा प्रश्नही उर्फीने विचारला आहे.
आदित्य चोप्रा नेमकं काय म्हणाले होते?
“लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. मी माझ्या चित्रपटांमध्ये कितीतरी नव्या लोकांना लाँच केले आहे. मी हे अगदी स्पष्ट सांगून शकतो की, माझा भाऊ अभिनेता आहे. मात्र, तो फार यशस्वी अभिनेता नाहीये. माझा भाऊ उदय हा मोठ्या चित्रपट निर्मात्याचा मुलगा आहे. त्याचा एक भाऊ म्हणजेच मी चित्रपट निर्माता आहे. YRF सारखी कंपनी असूनही तो फेमस अभिनेता होऊ शकला नाही. कारण फक्त एक दर्शक ठरवेल की त्याला ही व्यक्ती आवडते, मला या व्यक्तीला पाहायचे आहे की नाही, इतर कोणीही ते ठरवू शकत नाही” असं आदित्य चोप्रा म्हणाले होते.