बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा आज वाढदिवस आहे. त्या नेहमीच काही ना कारणांमुळे चर्चेत असते. उर्मिला यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत उत्तम स्थान निर्माण केले आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक चित्रपटात काम केले आहे. विशेष म्हणजे त्या ‘माधुरी, ‘आजोबा’ अशा अनेक मराठी चित्रपटातही झळकल्या. उर्मिला मातोंडकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचे पती मोहसिन अख्तर यांनी खास पोस्ट केली आहे.
उर्मिला मातोंडकर यांचे पती मोहसिन हे सोशल मीडियावर सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी उर्मिला मातोंडकर यांच्यासाठी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. याबरोबर त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ते उर्मिला मातोंडकरांच्या कपाळावर किस करताना दिसत आहे. याला त्यांनी हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : कंगना रणौतने केलेला उर्मिला मातोंडकरचा ‘सॉफ्ट पॉर्न अभिनेत्री’ म्हणून उल्लेख; नेमकं काय आहे प्रकरण?
मोहसिन अख्तरची पोस्ट
“काहीजण पुस्तक, कविता, गद्य यातून खऱ्या प्रेमाचा अनुभव घेतात. तर काहीजण कथा, नाटक आणि चित्रपटातून प्रेम अनुभवतात. पण मी मात्र तुझ्या डोळ्यातून प्रेमाचा अनुभव घेतला आहे. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे कारण मला तुझ्याबद्दलच्या सर्वच गोष्टी आवडतात. तू जशी आहेस तशीच राहा. अजिबात स्वत:मध्ये बदल करु नकोस. तुझी प्रत्येक कृती मला प्रेरणा देते. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या प्रिये”, असे त्यांचे पती मोहसिन अख्तर यांनी म्हटले आहे.
त्यांच्या या पोस्टवर उर्मिलानेही कमेंट केली आहे. त्यांनी तीन हार्ट इमोजी शेअर करत या पोस्टला प्रतिसाद दिला आहे.
आणखी वाचा : Video : “लग्न झाल्यानंतर मुलींपासून…” घटस्फोटाची धमकी दिल्यानंतर राखी सावंतचे पतीवर गंभीर आरोप
दरम्यान उर्मिलाने वयाच्या ४२ व्या वर्षी काश्मिरी व्यापारी आणि मॉडेल मोहसिन अख्तरसोबत लग्न केले. उर्मिलाने २०१६ मध्ये कोणालाही पूर्व कल्पना न देता लग्न केलं. मोहसिन हा तिच्याहून १० वर्षाने लहान आहे. त्या दोघांची भेट मनीष मल्होत्रामुळे झाली. मोहसिन हा कपड्यांचा व्यावसायिक आहे. एवढंच नाही तर झोया अख्तरच्या लक बाय चान्स चित्रपटात त्याने अभिनयही केला आहे.