Urmila Matondkar: प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री व राजकारणी उर्मिला मातोंडकर हिच्या घटस्फोटाच्या बातम्या काही दिवसांपासून येत आहेत. मराठमोळ्या उर्मिलाचा आठ वर्षांचा संसार मोडला असून तिने पती मोहसीन अख्तर मीरपासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज केल्याच्या चर्चा होत आहेत. अशातच मोहसीनने केलेल्या एका पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे.
उर्मिला व मोहसीन २०१६ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. उर्मिलानेलग्नाच्या आठ वर्षानंतर पती मोहसीनपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे., अशा चर्चा काही दिवसांपासून होत आहेत. “उर्मिलाने चार महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे,” असे वृत्त ‘ई टाइम्स’ने मुंबईतील एका न्यायालयातील सूत्राच्या हवाल्याने दिले होते. मोहसीन किंवा उर्मिलाने यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही, अशातच आता मोहसीनच्या पोस्टची चर्चा होत आहे.
हेही वाचा – Bigg Boss Marathi : निक्की तांबोळी सुरक्षित होताच अरबाज पटेलची प्रतिक्रिया, म्हणाला…
मोहसीनची स्टोरी
मोहसीनने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलं, “पेड पीआर आणि खोट्या बातम्या सत्य बदलू शकत नाही.”
उर्मिला व मोहसीन यांची भेट त्यांचा मित्र आणि बॉलीवूड डिझायनर मनीष मल्होत्रा मार्फत झाली होती. दोघे प्रेमात पडले आणि त्यांनी ३ मार्च २०१६ रोजी खासगी समारंभात लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नात फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. उर्मिला व मोहसीन यांच्या वयात १० वर्षांचे अंतर आहे, त्यामुळे यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. उर्मिला ५० वर्षांची आहे, तर मोहसीन ४० वर्षांचा आहे.
हेही वाचा – “मी सूरजचं पालकत्व…”, घराबाहेर जाताना पंढरीनाथ कांबळेने सांगितला मोठा निर्णय; सर्वत्र होतंय कौतुक
मोहसीन हा मूळचा काश्मिरचा आहे. तो व्यावसायिक आणि मॉडेल आहे. मोहसीनने २००९ मध्ये ‘इट्स अ मॅन्स वर्ल्ड’ चित्रपटातून पदार्पण केले, नंतर त्याने त्याच वर्षी ‘लक बाय चान्स’ मध्ये काम केलं. दोन वर्षांनी तो ‘मुंबई मस्त कलंदर’ मध्ये झळकला. त्याने ‘बी.ए. पास’ चित्रपटातही काम केलं होतं. आता तो मनीष मल्होत्राच्या ब्रँडबरोबर काम करतो.