शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. या चित्रपटाचं ‘बेशरम रंग’ हे गाणंही खूप गाजलं होतं. त्यावरून बराच वाद झाला मात्र तरीही हे गाणं मात्र प्रेक्षक चाहत्यांच्या पसंतीस उतरलं. अनेकांनी या गाण्यावर रील आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यात आता उर्वशी रौतेलाची भर पडली आहे. या गाण्यावर उर्वशीने अनोख्या अंदाजातला व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या असून त्यांनी ऋषभ पंतचाही यात उल्लेख केला आहे.

उर्वशी रौतेलाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती लाल रंगाच्या साडीत दिसत आहे. तिने या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला शाहरुख आणि दीपिकाच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं लावलं आहे. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, “हमें तो लूट लिया मिलके इश्क वालों ने” हे कॅप्शन वाचून अनेकांनी यात ऋषभ पंतचं नाव घेत कमेंट्स केल्या आहेत. ऋषभ पंत अपघातानंतर आता मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात आहे. तर उर्वशी सध्या Waltair Veerayya चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Shocking video Angry Hippopotamus Attacks Tourists At A Jungle Safari Animal Video Viral
सिंह-वाघापेक्षाही खतरनाक पाणघोड्याच्या नादाला लागले; जवळ जाताच केला खतरनाक हल्ला, VIDEO चा शेवट पाहून थरकाप उडेल
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”

आणखी वाचा- ऋषभ पंतला भेटण्यासाठी मुंबईत परतली उर्वशी रौतेला? ‘त्या’ फोटोने वेधलं लक्ष

उर्वशी रौतेलाच्या कमेंट बॉक्समध्ये ऋषभ पंतच्या नावने अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहिलं, “ऋषभ पंतला दुखापत झाल्यानंतर उर्वशीचं मनही दुखावलं आहे.” दुसऱ्या एका युजरने तर, “भाभीजी ऋषभ पंतची आठवण येतेय का?” अशी कमेंट केली आहे. ऋषभ पंतचा अपघात झाल्यानंतर त्याचं नाव न घेता उर्वशीने इन्स्टाग्रामवर प्रार्थना करत आहे असं कॅप्शन देत एक फोटो शेअर केला आहे.

आणखी वाचा- ऋषभ पंतच्या तब्येतीबद्दल उर्वशी रौतेलाच्या आईची पोस्ट; युजर म्हणाले, “मुलगी तर मुलगी आता आई…”

दरम्यान ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला मागच्या बऱ्याच काळापासून चर्चेत आहेत. एका मुलाखती उर्वशी असं काही बोलली की दोघांमध्ये वाद सुरू झाला होता. एकीकडे या दोघांचं अफेअर असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी लावला होता. तर दुसरीकडे हे दोघांमध्ये सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध रंगलं होतं.

Story img Loader