बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही नेहमी चर्चेत असते. कधी सुंदर, स्टनिंग, ग्लॅमरस फोटोमुळे तर कधी डान्समुळे उर्वशी चर्चेत असते. नुकतेच तिने तिच्या आईच्या वाढदिवसाच्या पार्टीतील डान्सचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत; जे तुफान व्हायरल झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री उर्वशी रौतेलाने आईच्या वाढदिवसाच्या पार्टीतील तीन व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या व्हिडीओंमध्ये ती शिमरी आउटफिटमध्ये दिसत असून जबरदस्त डान्स करताना पाहायला मिळत आहे. उर्वशीचा हा जबरदस्त डान्स पाहून अनेक जण हैराण झाले आहेत. तसेच तिला अनेकांनी या डान्समुळे ट्रोल केलं आहे.

हेही वाचा – Video: फुलांचा वर्षाव, पंचपक्वान्न अन् डान्स…; प्रथमेश परबने शेअर केला केळवणाचा व्हिडीओ, म्हणाला, “जेव्हा…”

उर्वशीच्या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिल आहे, “लहान मुलगी आहेस का?” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिल आहे, “अरे काय झालंय? करंट लागलाय का?” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिल आहे, “तुला कोणता आजार आहे भाई?” अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या व्हिडीओवर दिल्या आहेत.

हेही वाचा – “आयुष्याचं छान वर्तुळ पूर्ण करण्यासाठी पुरुषाची गरज नसते”, श्रृती मराठेचं वक्तव्य

दरम्यान, उर्वशीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, काही महिन्यांपूर्वी तिचं ‘बिग बॉस ओटीटी २’ विजेता एल्विश यादवबरोबर गाणं आलं होतं. ‘हम तो दिवाने’ असं त्या गाण्याचं नाव असून या गाण्यामध्ये दोघांची छान केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. हे गाणं खूपच व्हायरल झालं होतं. या गाण्यानंतर उर्वशीची एक कॉन्ट्रोवर्सी सुरू झाली होती. अभिनेत्रीचं नाव पाकिस्तानी क्रिकेटरबरोबर जोडलं जाऊ लागलं. त्यानंतर ती अनेकदा ट्रोल झाली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urvashi rautel dance on mother birthday party video viral pps