बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी तिच्या फॅशन आणि स्टाइलमुळे तर कधी डेटिंगच्या बातम्यांमुळे. याचदरम्यान तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती तिच्या अभिनयाच्या फीबद्दल बोलताना दिसतेय. उर्वशी म्हणाली की ती सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्स तिला खूप ट्रोल करत आहेत.

“बँकेचे लोक पाहून भीती वाटायची,” गश्मीर महाजनीने सांगितली आठवण; म्हणाला, “मी रात्री रस्त्यावर पोस्टर…”

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका रिपोर्टरने उर्वशी रौतेलाला विचारलं की, तू प्रत्येक मिनिटाला 1 कोटी रुपये मानधन घेत असल्याने सर्वात जास्त कमाई करणारी अभिनेत्री बनली आहेस. त्यावर उर्वशी म्हणाली, “खूप चांगलं वाटतंय. मला वाटतं प्रत्येक सेल्फ-मेड अभिनेता आणि अभिनेत्रीने त्यांच्या करिअरमध्ये हे यश पाहिलं पाहिजे.” दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी उर्वशीला प्रचंड ट्रोल करत आहेत.

उर्वशीच्या या व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, “दीदी १ तासात ६० कोटी कमावतात!! एका दिवसात १४४० कोटी !! व्वा, ताई तुम्ही मंगळावर जा आणि तिथेच राहा, इथे काही गरज नाही. एका यूजरने लिहिलं “म्हणूनच ताईंना कोणीही आपल्या चित्रपटात कास्ट करत नाही.” दुसर्‍या यूजरने लिहिलं की सेल्फ मेड सुपरस्टार उर्वशी रौतेलाने १ मिनिटासाठी १०० कोटी रुपये घ्यावे. “दीदी तुमची १ मिनिटाची कमाई मला द्या, माझी स्वप्ने पूर्ण होतील,” असं एक युजर म्हणाला.

urvashi troll comments
उर्वशी रौतेलाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्स

दरम्यान, ‘घरात बसून अशी स्वप्ने मीही पाहते’. ‘राखीची लहान बहीण’, ‘कंगना रणौत आणि आलिया भट्ट कोपऱ्यात उभ्या राहून हसतायत’, ‘तिला कोणी अफोर्ड करू शकत नाही, म्हणून तिला चित्रपटात घेत नाही,’ अशा कमेंट्सही नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Story img Loader