हृतिक रोशन आणि आदित्य रॉय कपूर हे अभिनेते त्यांच्या प्रेमप्रकरणांमुळे आणि डेटिंग लाईफमुळे नेहमीच चर्चेत असतात. हृतिक रोशन सध्या साबा आझादला डेट करत आहे, तर आदित्य रॉय कपूरचे अनन्या पांडेशी ब्रेकअप झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. उर्वशी रौतेलाने याच दोन अभिनेत्यांबाबतीत एक मोठा दावा केला आहे. उर्वशीने सांगितले की, तिने या दोन्ही अभिनेत्यांना एका डेटिंग अ‍ॅपवर पाहिले आहे.

उर्वशी रौतेलाने एका मुलाखतीत सांगितले की, ती स्वतः एक डेटिंग अ‍ॅप वापरत आहे आणि तिने याच अ‍ॅपवर हृतिक रोशन आणि आदित्य रॉय कपूर यांचे प्रोफाईल्स पाहिले आहेत. काही दिवसांपूर्वी हृतिक आणि आदित्य हे डेटिंग अ‍ॅपचा वापर करत असल्याच्या बातम्या येत होत्या, मात्र फॅन्सना त्यांच्या आवडत्या अभिनेत्यांचे प्रोफाइल दिसले नव्हते. कारण हे सेलिब्रिटी एका खास आणि वेगळ्या अॅपचा वापर करतात.

aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
shradhha kapoor boyfriend
श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवरील ‘ती’ व्यक्ती कोण? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण
Masaba Gupta baby girl name is Matara
३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…
priya bapat shares opinion on marathi industry
“क्षमता असूनही उमेशला मराठी सिनेमे ऑफर झाले नाहीत” प्रिया बापटने व्यक्त केली खंत; कलाकार म्हणून मांडलं प्रामाणिक मत
priya bapat praises riteish deshmukh
“जेव्हा मराठी माणसं हिंदी सेटवर भेटतात…”, रितेश देशमुखबद्दल काय म्हणाली प्रिया बापट? ‘ती’ गोष्ट प्रचंड भावली
pritish nandi died bollywood celebrities pays tribute
प्रसिद्ध निर्माते प्रीतीश नंदी यांचे निधन, करीना कपूरसह ‘या’ बॉलीवूड सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली; संजय दत्त पोस्ट करत म्हणाला…
Marathi Actress Nupur Chitale
मालिकांमधून ब्रेक, ५ वर्षांसाठी गाठली दिल्ली अन्…; ‘रात्रीस खेळ चाले’मधली देविका आठवतेय का? अभिनेत्री सध्या काय करते?

हेही वाचा…मॅनेजर उद्धट वागल्याने मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढलं, विवेक अग्निहोत्रींचा खुलासा; म्हणाले, “स्टार किडच्या…”

उर्वशी काय म्हणाली?

उर्वशीने ‘हॉटरफ्लाय’शी बोलताना सांगितले की, “मी एक डेटिंग अ‍ॅप वापरत आहे आणि तिथे मी हृतिक रोशन आणि आदित्य रॉय कपूर यांचे प्रोफाइल पाहिले.” या डेटिंग अ‍ॅपवर अनेक सेलिब्रिटीज असल्याचं उर्वशीने सांगितले. ती हे अ‍ॅप केवळ नवे मित्र बनवण्यासाठी वापरते, असंही तिने स्पष्ट केलं.

हेही वाचा……आणि गोविंदाने ‘ते’ गाणं १५ मिनिटांत शूट करून दाखवलं, आयफेल टॉवर समोर परवानगी नसतानाही केलं चित्रीकरण

उर्वशीने हृतिकला राईट स्वाईप केलं का?

उर्वशीला डेटिंगअ‍ॅपवर हृतिक आणि आदित्य दिसले तेव्हा तिने त्यांना राईट स्वाईप केलं का, असा प्रश्न विचारला असता उर्वशीने उत्तर दिलं, “मी या अ‍ॅपवर कोणत्याही सेलिब्रिटीजना राईट स्वाईप केलेलं नाही, माझ्याकडे त्यांचे मोबाइल नंबर आहेत, त्यामुळे मला त्यांना कोणत्याही वेळी संपर्क साधता येतो.”

उर्वशीने सेलिब्रिटीज डेटिंग अ‍ॅपवर आहे, हा दावा करण्याआधी बऱ्याच सेलिब्रिटीजचे डेटिंग अ‍ॅपवरील प्रोफाइलचे स्क्रीन शॉट व्हायरल झाले होते.

Story img Loader