अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि क्रिकेटपटू ऋषभ पंत या दोघांमधील शाब्दिक युद्ध काही महिन्यांपूर्वी चांगलंच चर्चेत राहिलं होतं. पण ऋषभचा अपघात झाल्यानंतर उर्वशीने त्याच्या निरोगी आरोग्यासाठी प्रार्थना करत असल्याचं म्हटलं होतं. ऋषभ सध्या अपघातातून सावरतोय, अशातच उर्वशीला त्याच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. पण प्रश्नाचं उत्तर देणं तिने टाळलं.

“मी त्याला म्हटलं होतं की…”, सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत स्मृती इराणींना अश्रू अनावर; म्हणाल्या “त्याच्या मृत्यूच्या दिवशी मी…”

उर्वशीला ऋषभ पंतबद्दल प्रश्न विचारल्यावर ती संतापल्याचं पाहायला मिळालं. तसेच तिने उत्तरही दिलं नाही. ‘इन्स्टंट बॉलिवूड’ने शनिवारी त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक नवीन व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये उर्वशी रौतेलाला क्रिकेटर ऋषभ पंतबद्दल प्रश्न विचारला जातो. पण, ती त्यावर उत्तर देत नाही, तसेच “तुम्हाला नक्की काय हवंय माझ्याकडून, तुम्हाला टीआरपी पाहिजे आहे, म्हणून हा प्रश्न विचारताय का, पण यावेळी मी तुम्हाला टीआरपी देणार नाही,” असं ती म्हणते.

अशाप्रकारे भारतीय क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज ऋषभ पंतबद्दलच्या प्रश्नावर उर्वशी रौतेला संतापलेली दिसली आहे. उर्वशीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दुसरीकडे ऋषभ मात्र आराम करत असून दुखापतीतून सावरत आहे.

Story img Loader