बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला कायमच चर्चेत असते. सध्या उर्वशी एका कौटुंबिक कार्यक्रमात व्यग्र आहे. उर्वशी तिच्या भावाच्या लग्नासाठी उत्तराखंडला गेली आहे. तिचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

उर्वशीच्या आत्याच्या मुलाचं लग्न होतं. लग्नातील नवरा-नवरीच्या कपड्यांची, दागिन्यांची चर्चा होताना दिसते. परंतु, आतेभावाच्या लग्नात उर्वशीच्या लूकची चर्चा रंगली होती. उर्वशीने लग्नात भरजरी लेहेंगा परिधान करत ग्लॅमरस लूक केला होता. या लेहेंग्यावर तिने मॅचिंग खड्यांची ज्वेलरीही घातली होती.

हेही वाचा>> हार्दिकशी लग्नगाठ बांधल्यानंतर अक्षया भावूक; लग्नाची तारीख कोरलेल्या नखांचा फोटो शेअर करत म्हणली…

हेही वाचा>> “आम्हाला मार्गदर्शन करण्याबरोबरच…” अनिल कपूर यांच्या ट्वीटनंतर जितेंद्र जोशीने शेअर केली भावूक पोस्ट

लग्नातील उर्वशीच्या लूकने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार, उर्वशीने भावाच्या लग्नासाठी खास डिझाइन केलेल्या या लेहेंग्याची किंमत ३५ लाख रुपये इतकी होती. तर ग्लॅमरस लूकसाठी तिने ज्वेलरीवर तब्बल ८५ लाख रुपये खर्च केल्याची माहिती आहे. म्हणजेच जवळपास उर्वशीने भावाच्या लग्नासाठी एक कोटींहून अधिक खर्च तिचे कपडे व दागिन्यांवर केला आहे.

हेही वाचा>> प्राजक्ता माळीला लागले प्रेमाचे वेध? फोटो शेअर करत म्हणाली…

उर्वशीचं ‘वॉल्टेअर वीरैय्या’ या दाक्षिणात्य चित्रपटातील गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या आयटम सॉंगमध्ये तिने सुपरस्टार चिरंजीवीसह स्क्रीन शेअर केली आहे.

Story img Loader