दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी त्यांच्या आगामी ‘वॉल्टेयर वीरैया'(Waltair Veerayya) या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. मकर संक्रांतीच्या मुहुर्तावर २०२३ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात चिरंजीवीसह दाक्षिणात्य अभिनेता रवी तेजाही प्रमुख नायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

चिरंजीवींच्या या बहुचर्चित चित्रपटात आता बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाची वर्णी लागली आहे. प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉल्टेयर वीरैया या चित्रपटात उर्वशी कैमिओ करणार आहे. चित्रपटात चिरंजीवी आणि रवी तेजा यांच्यावर एक गाणं चित्रीत करण्यात येणार आहे. उर्वशी चित्रपटातील या आयटम सॉंगमध्ये झळकणार आहे. त्यामुळे चिरंजीवी, रवी तेजा आणि उर्वशी हे त्रिकुट पहिल्यांदाच चाहत्यांना ऑन स्क्रीन दिसणार आहे.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
virat kohli anushka sharma gate way
VIDEO : विराट-अनुष्का मुंबईत परतले! गेटवे ऑफ इंडियाला दिसले एकत्र, विरुष्काच्या चाहतीची ‘ती’ रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल
Sangeet Manapmaan Movie Review in marathi
नावीन्यपूर्ण अनुभव देणारा चित्रप्रयोग
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
Aishwarya And Avinash Narkar dance video
नारकर जोडप्याचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! Video पाहून मराठी अभिनेत्री म्हणते, “हा ग्रुप कसा जॉईन करायचा…”
Nitish Chavan
‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणने शेअर केला ईशा संजयबरोबर व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नाव सांगू का शीतलला?”

हेही वाचा >> ‘हर हर महादेव’ चित्रपटाबद्दल कॅबिनेट मंत्र्याचं सुबोध भावेला पत्र, म्हणाले “छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका…”

उर्वशीचं चित्रपटातील आयटम सॉंग प्रसिद्ध कोरिओग्राफर शेखर मास्टर यांनी कोरिओग्राफ केलं असून लवकरच त्याच्या चित्रीकरणालाही सुरुवात होणार आहे. उर्वशीने याआधीही अनेक आयटम सॉंगद्वारे तिचा जलवा मोठ्या पडद्यावर दाखवला आहे. ‘रेशम का रुमाल’, ‘आय वाना तेरा इश्क’, ‘लिपस्टिक लगा के’ अशा हिट गाण्यांमधून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

हेही वाचा >> ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्याने चारू असोपाबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन, म्हणाला “माझं तिच्याबरोबर…”

वॉल्टेयर वीरैया या चित्रपटात चिरंजीवींसह दाक्षिणात्य अभिनेत्री श्रुती हसन मुख्य नायिकेची भूमिका साकारताना दिसणार आहे. चिरंजीवींच्या या अक्शनपटाची चाहतेही आतुरतेने वाट बघत आहेत. दरम्यान सलमान खानबरोबरचा चिरंजीवींच्या गॉडफादर या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटालाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.

Story img Loader