बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अहमदाबादमध्ये झालेल्या भारत आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान उर्वशीचा २४ कॅरेट सोन्याचा आयफोन हरवला होता. उवर्शीने सोशल मीडियावर पोस्ट शेअऱ करत ही माहिती दिली होती. अद्याप उर्वशीला तिचा फोन मिळालेला नाही. दरम्यान उर्वशीने फोन शोधून देणाऱ्या व्यक्तीला बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

हेही वाचा- राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला आलिया भट्टने का नेसली लग्नाची साडी? अभिनेत्रीचा खुलासा ऐकून सर्वत्र होतंय कौतुक

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत उर्वशीने लोकांना मदतीचे आवाहन केले आहे. चोरीप्रकरणी दाखल केलेल्या पोलीस तक्रारीची प्रतही उर्वशीने शेअर केली आहे. उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिच्या फोनचे लोकेशन शेअर केले आहे. अहमदाबादमधील एका मॉलमध्ये उवर्शीचा फोन शेवटचा ट्रॅक करण्यात आला होता. जो कुणी तिचा फोन तिला परत करेल त्या व्यक्तीला बक्षीस देण्यात येईल अशी घोषणाही उर्वशीने केली आहे.

याआधी उर्वशीने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून तिचा २४ कॅरेट सोन्याचा आयफोन हरवला असल्याचे सांगितले होते. उवर्शीने पोस्ट शेअर करत लिहिले होते की, ‘नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये माझा २४ कॅरेटचा आयफोन हरवला आहे. कृपया कोणाला आढळल्यास त्वरित संपर्क साधावा. यासोबतच अभिनेत्रीने तिच्या ट्वीटरवरही ही माहिती शेअर केली होती. त्यानंतर अहमदाबाद पोलिसांनी उर्वशी रौतेलाच्या पोस्टवर कमेंट करत मोबाइल फोन डिटेल्स मागितले होते.