अनेकांचं बॉलीवूडमध्ये करिअर करायचं स्वप्न असतं. चित्रपटात मुख्य भूमिका करायची, यश मिळवायचं यासाठी अनेक कलाकार मेहनत घेतात. काहींना संधीच मिळत नाही, तर काहींना संधी मिळून ते अपयशी ठरतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे उर्वशी रौतेला होय. तिला बॉलीवूडमध्ये १० वर्षे झाली आहेत, पण आजवर तिचा एकही चित्रपट हिट झालेला नाही. तरीही ती भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने अभिनयात येण्यापूर्वी अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत आणि मॉडेलिंगच्या आधारे केवळ देशातच नाही तर परदेशातही नाव कमावलं. परंतु बॉलीवूडमधील तिचं करिअर फार खास राहिलं नाही. आता ती चित्रपटांमध्ये फक्त आयटम नंबर करताना दिसत आहे. मात्र, याचा तिच्या लोकप्रियतेवर कोणताही परिणाम झालेला नाही. उर्वशी एका डान्ससाठी मानधन म्हणून कोट्यवधी रुपये घेते. तिने पहिल्या चित्रपटात तिच्यापेक्षा ३८ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासह रोमान्स केला होता, पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. यासंदर्भात ‘डीएनए’ ने वृत्त दिलं आहे.

marathi actress vishakha subhedar dance with niece watch video
Video: “तुमचा वारसा ही पुढे चालवणार”, विशाखा सुभेदारचा भाचीबरोबरचा जबरदस्त डान्स पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
savlyachi Janu Savali fame veena jagtap gift to megha dhade
Video: ‘सावळ्याची जणू सावली’ फेम वीणा जगतापने मेघा धाडेला दिवाळीनिमित्ताने दिलं खास गिफ्ट, व्हिडीओ होतोय व्हायरल
sobhita dhulipala celebrated diwali with naga chaitnya and family
लग्नाआधी सोभिता धुलीपालानं नागा चैतन्याच्या कुटुंबासह साजरी केली दिवाळी; अभिनेत्रीच्या साडीतल्या लूकमुळे वेधलं लक्ष, पाहा फोटो
Actress Vidya Balan explanation of the movie Bhulbhulaiyaa 3
डझनावारी चित्रपटांतून नकाराचा अनुभव; ‘भुलभुलैया ३’ चित्रपटातील अभिनेत्री विद्या बालनचे स्पष्टीकरण
Chahatt Khanna New Home
दोन प्रेमविवाह, दोन्ही वेळा घटस्फोट; आता अभिनेत्रीने खरेदी केलं आलिशान घर, दिवाळीनिमित्त दाखवली घराची झलक
billy zane going to play Marlon Brando role
‘टायटॅनिक’फेम अभिनेता बिली झेनचा नव्या सिनेमातील लूक पाहून चाहते झाले चकित; म्हणाले, “ऑस्कर नामांकन…”
Marathi Actress tejaswini pandit sister Poornima Pullan gave birth to a baby girl
“१४ वर्षांचा अपत्यप्राप्तीसाठीचा वनवास यंदाच्या दिवाळीत संपला”, अभिनेत्री तेजस्विनी पंडित झाली मावशी; म्हणाली, “लक्ष्मी आली”

पती नुपूर शिखरेपेक्षा तब्बल ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे आयरा खान; आमिर खानची लेक २६ वर्षांची, तर जावई…

एकदा अशी बातमी आली होती की उर्वशी रौतेलाने दक्षिण भारतीय मेगास्टार चिरंजीवी अभिनीत ‘वॉल्टेअर वीरैया’ मधील आयटम नंबरसाठी २ कोटी रुपये घेतले होते. ‘सियासत’ च्या वृत्तानुसार तिने ‘बोयापती श्रीनू’ या राम पोथीनेनीच्या आगामी चित्रपटातील तीन मिनिटांच्या सीनसाठी३ कोटी रुपयांची मागणी केली आहे. याचा अर्थ तिला प्रत्येत मिनिटासाठी १ कोटी रुपये दिले जातील, ज्यामुळे ती भारतातील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री बनेल.

पद्मिनी कोल्हापूरे होणार आजी, सूनेच्या डोहाळे जेवणाचे फोटो चर्चेत, श्रद्धा कपूरच्या मराठी लूकने वेधलं लक्ष

उर्वशीने २०१३ मध्ये ‘सिंह साब द ग्रेट’ या चित्रपटातून पदार्पण केलं. यात तिने सनी देओलसोबत काम केलं होतं. त्यावेळी ती फक्त १९ वर्षांची होती आणि तिने त्यावेळी ५७ वर्षांचा असलेल्या सनी देओलसोबत रोमँटिक सीन दिले होते. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप ठरला होता. बॉक्स ऑफिस इंडियानुसार, चित्रपटाचे बजेट ४२ कोटी रुपये होते आणि त्याने फक्त ३२ कोटींची कमाई केली होती.

Video: “तू नाचलीस ना बास झालं…”, गौतमी पाटीलचा नवा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप, “जरातरी लाजावं की…”

यानंतर उर्वशीच्या करिअरला जणू उतरती कळा लागली. खरं तर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं, पण एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकला नाही. पहिल्या सिनेमानंतर तीन वर्षांनी तिने ‘सनम रे’ चित्रपटात काम केले, यात ती जोडी पुलकित सम्राटसोबत होती. यामी गौतम देखील यात होती. पण यात उर्वशीचा कॅमिओ होता, पण हा चित्रपटही फ्लॉप झाला. मग तिने २०१८ मध्ये ‘हेट स्टोरी ४’ आणि २०१९ मध्ये ‘पागलपंती’ मध्ये काम केलं होतं. पण हे चित्रपटही यशस्वी ठरले नाही. उर्वशीने बॉलीवूडमध्ये १० वर्षे पूर्ण केली आहेत, परंतु तिचा एकही चित्रपट हिट झाला नाही. येत्या काळात ती ‘दिल है ग्रे’ आणि ‘ब्लॅक रोज’मध्ये दिसणार आहे.

अभिनयाव्यतिरिक्त उर्वशी रौतेला क्रिकेटपटू रिषभ पंतबरोबरच्या कथित नात्यामुळे खूप चर्चेत होती. त्यांची भांडणं सोशल मीडियावरही पाहायला मिळाली होती. रिषभला आपण आवडत असल्याचा दावा उर्वशीने केला होता. पण रिषभने लोक खोटं बोलत असल्याची पोस्ट नाव न घेता केली होती.