अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या सोशल मीडियावर सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतचा अपघात झाल्यानंतर उर्वशी सोशल मीडियावर बरीच ट्रोल झाली होती. तिच्या पोस्टवर कमेंट्स करत युजर्सनी तिला खूप सुनावलंही होतं. अशात आता उर्वशी एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली असून तिच्या या पोस्टचा थेट संबंध ऋषभ पंतशी जोडला जात आहे.

उर्वशी रौतेला सध्या मुंबईमध्ये आहे आणि हा एक योगायोग आहे की ती त्याच रुग्णालयाच्या आजूबाजूला होती जिथे क्रिकेटर ऋषभ पंतवर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याचा अपघात झाला होता आणि आता त्याला उपचारांसाठी मुंबईच्या धीरूभाई अंबानी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. अशात आता उर्वशी ऋषभला भेटण्यासाठी रुग्णालयात गेल्याचं बोललं जात आहे.

Sunil Tatkare
Sunil Tatkare : “आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून…”; अमित शाह-शरद पवार भेटीनंतर सुनील तटकरेंची महत्त्वाची प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Sai Pallavi reacts on turning vegetarian for Sita role in Ramayana
‘रामायण’ सिनेमासाठी मांसाहार सोडल्याचे वृत्त पाहून भडकली साई पल्लवी; कायदेशीर कारवाईचा इशारा देत म्हणाली…
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Dr Pardeshi appointment as cms secretary revived old memories in Yavatmal and district is also expressing happiness
डॉ. श्रीकर परदेशी मुख्यमंत्र्यांचे सचिव होताच यवतमाळात आनंद
Migratory birds started arriving in Gondia district due to increasing cold in European countries
नवेगावबांध जलाशयांवर परदेशी पाहुण्यांचा स्वच्छंद विहार,पक्षी प्रेमींना पर्वणी

आणखी वाचा- “तिथे ऋषभची प्रकृती गंभीर आहे आणि तू…” सेलिब्रेशनचा व्हिडीओ पोस्ट केल्याने उर्वशी रौतेलावर नेटकरी नाराज

उर्वशी रौतेलाने गुरुवारी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता. हा रुग्णालयाचा फोटो होता. ती या रुग्णालयाच्या आजूबाजूला होती. या फोटोला उर्वशी काही कॅप्शन दिलं नव्हतं मात्र त्याला ‘धीरूभाई अंबानी हॉस्पिटल’ असा लोकेशन टॅग होता. बुधवारी ऋषभ पंतला शस्त्रक्रियेसाठी डेहराडूनवरून मुंबईला आणण्यात आलं होतं. त्यानंतर उर्वशीची इन्स्टाग्राम स्टोरी पाहता अनेकांनी ती ऋषभला भेटण्यासाठी रुग्णालयात गेल्याचा अंदाज बांधला आहे.

urvashi rautela isntagram

उर्वशी नवीन वर्षात स्वागत करण्यासाठी आणि तिच्या आईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबियांबरोबर दुबईला रवाना झाली होती. बुर्ज खलिफा जवळच्या एका हॉटेलच्या टेरेसवर त्यांनी रात्री बारा वाजता केक कापत उर्वशीच्या आईचा वाढदिवस साजरा केला होता. तिने हा व्हिडीओ पोस्ट करताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली होती. त्यानंतर आता ती मुंबईला परतली आहे आणि तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून सोशल मीडियावर चर्चाही रंगली आहे.

आणखी वाचा- विमानतळावर जाताना उर्वशीच्या ड्रेसचे स्लीव्ह्स घसरले अन्….व्हिडीओ व्हायरल

दरम्यान २०२२ च्या अखेरीस म्हणजेच ३० डिसेंबरला ऋषभ पंतच्या कारला गंभीर अपघात धाला होता. तो दिल्लीतून रुडकी येथे परतत असताना नारसन बॉर्डरवरील हम्मादपूर येथे दुभाजकावर आदळली. दिल्ली- डेहराडून महामार्गावर हा अपघात झाला तेव्हा ऋषभ पंत कारमध्ये एकटाच होता. त्याच्या पाठीला, डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातानंतर ऋषभ कारच्या काचा फोडून बाहेर पडला आणि त्यानंतर ही कार जळून गेली होती. एवढ्या भीषण अपघातातून तो थोडक्यात बचावला आहे.

Story img Loader