अभिनेत्री उर्वशी रौतेलाला नेहमीच भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या नावाने चिडवलं जातं. मीडिया असो किंवा चाहते सगळेच तिला पाहताच ऋषभच्या नावाचा घोष करताना दिसतात. अनेकदा तर उर्वशीच अशा संधी देते जिथे तिचं नाव ऋषभ पंतशी जोडलं जातं आणि ती चर्चेत येते. आताही असंच काहीसं घडलं आहे. नुकतीच उर्वशी विमानतळावर दिसली आणि तिला पापाराझींनी ऋषभ पंतच्या प्रकृतीबद्दल विचारलं. त्यावर उर्वशीने दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उर्वशी तिच्या कामानिमित्त जगभरात प्रवास करत असते. अशात ती आज मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. तिला पाहताच पापाराझींनी घेरलं आणि तिला ऋषभ पंतबद्दल प्रश्न विचारला. विशेष म्हणजे या प्रश्नाचं उर्वशीने उत्तरही दिलं. “उर्वशी मॅम तुम्ही इन्स्टाग्रामवर ऋषभ पंतचा फोटो पाहिलात का?” असा प्रश्न उर्वशीला विचारण्यात आला होता. त्यावर उर्वशी म्हणाली, “कोणता फोटो?” तर पापाराझींनी, “ऋषभ पंत रिकव्हर होत आहे” असं उत्तर दिलं.

आणखी वाचा- “ऋषभ नाहीतर रिषभ…” ‘कांतारा’ अभिनेत्याबरोबरच्या ‘त्या’ पोस्टमुळे उर्वशी रौतेला ट्रोल

पापाराझींच्या या बोलण्यावर उर्वशीने होकार दिला तर त्यांनी, “तो लवकरच ठीक होईल” असं उत्तर दिलं. त्यानंतर उर्वशी म्हणते, “हो हो, तो आपल्या भारताचा महत्त्वाचा व्यक्ती आहे. देशासाठी अभिमानची गोष्ट आहे.” त्यावर पापाराझींनीही तिची मस्करी करत, “आमच्या प्रार्थना त्याच्याबरोबर आहेत.” असं म्हटलं. त्यावर उर्वशीनेही, “आमच्याही प्रार्थना त्याच्याबरोबर आहेत.” अशी प्रतिक्रिया दिली. उर्वशीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी धम्माल प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

आणखी वाचा- लग्नाआधीच्या ‘त्या’ ट्वीटमुळे स्वरा भास्कर झाली ट्रोल, नेटकरी म्हणाले, “आधी भाऊ म्हटलं आणि…”

या व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने लिहिलं, “हो तुझ्याच प्रार्थनांमुळे तो आता ठीक होत आहे ना.” दुसऱ्या युजरने कमेंट केली, “इथे काही समजत नाही असं दाखवतेस मग इन्स्टाग्रामवर लगेच स्टोरी का बदलतेस.” तर आणखी एका युजरने लिहिलं, “आता हिने तर पार्टी बदलली आहे. नसीमबद्दल प्रश्न विचारा, ऋषभबद्दल विचारू नका.” याशिवाय एका युजरने तर, “आता प्रार्थना सोबत आहेत मग याआधी काय होतं?” अशीही कमेंट केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urvashi rautela reaction on question about rishabh pant health recovery mrj