उर्वशी रौतेलाने तिच्या करिअरची सुरूवात मॉडेलिंगपासून केली. २०१२ साली ‘आय एम शी – मिस युनिव्हर्स इंडिया’ सौंदर्यस्पर्धेत ती जिंकली होती. परंतु ‘मिस युनिव्हर्स’ २०१२ मध्ये तिला सहभागी होता आले नाही याची खंत तिला नेहमी वाटते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१२ सालची ‘आय एम शी – मिस युनिव्हर्स इंडिया’ स्पर्धा जिंकल्यानंतर उर्वशी रौतेलाचं पुढचं ध्येय ‘मिस युनिव्हर्स’ जिंकण्याचं होतं. परंतु, शेवटच्या क्षणी काही अडचणी आल्यामुळे तिला ते साध्य करता आलं नाही. तेव्हा भारताचे प्रतिनिधी निवडण्याची जबाबदारी सुश्मिता सेन यांच्या कंपनीकडे होती.

‘मिरची प्लस’ला दिलेल्या मुलाखतीत उर्वशीने याबाबत खुलासा केला. ती म्हणाली, “मी जेव्हा २०१२ मध्ये पहिल्यांदा ‘मिस युनिव्हर्स इंडिया’चा किताब जिंकले. तेव्हा डोनाल्ड ट्रम्प आमचे बॉस होते आणि मला सांगण्यात आले होते की ‘मिस युनिव्हर्स’साठी वयाची मर्यादा आहे. ‘मिस युनिव्हर्स’स मध्ये सहभाग घेण्यासाठी वय मर्यादा १८ होती. याबद्दल मला काहिचं माहित नव्हतं. मी तेव्हा १७ वर्षांची होती आणि लवकरच १८ वर्षांची होणार होती. परंतु २४ दिवसांनी माझी संधी हुकली.

हेही वाचा… ‘गुलाबी साडी…’, मराठी गाण्यावर आजीसह थिरकली अदा शर्मा; व्हिडीओ व्हायरल

उर्वशी पुढे म्हणाली, तेव्हा ती खूप उदास झाली होता. “मला सुश्मिता सेन म्हणाली होती की, “उर्वशी तू सहभाग घेऊ शकत नाहीस.” ती संधी जवळ येऊन हुकली होती. मी इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. जर ‘आय एम शी – मिस युनिव्हर्स इंडिया’ मध्ये मी सगळ्यांना हरवून पुढे येऊ शकते तर ‘मिस युनिव्हर्स’ मध्ये वय मर्यादा कशासाठी? असा प्रश्न मला पडायचा.”

हेही वाचा… रकुल प्रीत आणि क्रिती खरबंदापाठोपाठ आता बॉलीवूडची क्वीन कंगना रणौत अडकणार लग्नबंधनात? चर्चांना उधाण

“२०१५ मध्ये मी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला पण तोपर्यंत मी थोड्याफार चित्रपट आणि गाणी केली होती. बाकीच्या स्पर्धकांनी विचार केला की, मी इथे काय करतेय.

आयुष्यात काही गोष्टी तुमच्या विरोधात होतात पण तुम्हाला सतत तुमच्या अस्तित्वासाठी लढावं लागतं. मी ऑडिशन दिलं आणि खूप मेहनत घेतली. मी कोणत्या परिस्थितीतून जातेय हे कोणालाच कळलं नाही. सगळेजण मला हेचं विचारत होते की, मी का सहभाग घेतेय? पण माझी मेहनत, जिद्द आणि इच्छा कोणालाचं कळली नाही.

हेही वाचा… ठरलं तर मग : न्यायालयाची सुनावणी अन् महिपतला अटक; अर्जुन आणि सायलीने उघड केलं सत्य, पाहा प्रोमो

दरम्यान उर्वशीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, उर्वशी आगामी चित्रपट ‘जेएनयू’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ बोडके मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urvashi rautela said that sushmita sen told her that she cant participate in miss universe 2012 dvr