अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. उर्वशी तिच्या सौंदर्य आणि स्टाईलमुळे प्रसिद्ध आहे. चित्रपटांपेक्षा वयक्तिक आयुष्यामुळेच उर्वशी नेहमी चर्चेत असते. सध्या उर्वशी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. तिच्याबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्यामुळे ती चिडली आहे. उर्वशीने युएईस्थित स्वयंघोषित चित्रपट समीक्षक उमैर संधूला मानहानीची नोटीस पाठवली आहे. दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन यांचा मुलगा अखिल अक्किनेनीने उर्वशीला ‘एजंट’ या चित्रपटाच्या सेटवर त्रास दिल्याचं वृत्त उमैरने दिलं होतं. आता या वृत्ताविरोधात उर्वशीने कायदेशीर कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिने माहिती दिली आहे.
हेही वाचा- आली रे आली, ‘सिंघम अगेन’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली; लवकरच शूटिंगला होणार सुरुवात
उमैर संधूने उर्वशी आणि अखिल अक्किनेनी यांच्याविषयी एक पोस्ट लिहिली होती. अखिलने एजंट या चित्रपटाच्या सेटवर उर्वशीला त्रास दिला असल्याचं त्याने पोस्टमध्ये लिहिलं होतं. इतकंच नव्हे तर उर्वशीच्या मते अखिल हा बालिश कलाकार असून त्याच्यासोबत काम करताना अनेक अडचणी येत असल्याचेही पोस्टमध्ये लिहिलं होतं.
हेही वाचा- चिडलेल्या काजोलने केली शिवीगाळ; पोस्ट करत म्हणाली..
उमैरच्या या पोस्टनंतर उर्वशी चांगलीच संतापली आहे. ‘माझ्या लीगल टीमकडून त्यांना मानहानीची नोटीस बजावण्यात आली आहे. अशा खोट्या ट्विट्समुळे तुमच्यासारख्या पत्रकारांवर मी नाराज आहे. तुम्ही माझे अधिकृत प्रवक्ते नाहीत. पण तुम्ही नक्कीच बालिश पत्रकार आहेत ज्याने मला आणि माझ्या कुटुंबीयांना त्रास दिला आहे’ असे उर्वशीने पोस्ट करत सांगितले आहे.
उवर्शीच्या या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलं डम आम्ही तुमच्या पाठिशी आहोत’ तर दुसऱ्याने तू खूप चांगलं केलंस म्हणत उवर्शीला पाठिंबा दिला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल अशा प्रकारचे ट्विट्स करण्याची उमैर संधूची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याने बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल अशा प्रकारचे ट्विट्स केले आहेत. त्याने सेलिना जेटलीबद्दलही ट्वीट करत खळबळ माजवून दिली होती. सेलिना ही अशी एकमेव अभिनेत्री आहे, जिचे पिता फिरोज खान आणि मुलगा फरदीन खान यांच्याबरोबर शाररिक संबंध होते. या ट्विटनंतर सेलिना चांगलीच भडकली होती आणि तिने उमैर सडेतोड उत्तर दिले होते.