अभिनेत्री आणि मॉडेल उर्वशी रौतेला गेल्या काही दिवसांपासून ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. किक्रेटपटू ऋषभ पंत आणि तिच्यामध्ये सुरु असलेला वाद सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. काही वर्षांपूर्वी ते दोघे एकमेकांना डेट करत होते असे लोक म्हणत होते. त्यावेळी दोघांनीही त्याबद्दल बोलणे टाळले होते. याच संबंधांवरुन त्याच्यामध्ये वाद सुरु असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मध्यंतरी एका मुलाखतीमध्ये तिने ‘आरपी’ म्हणून एका व्यक्तीचा उल्लेख केला होता. या संपूर्ण प्रकरणामुळे ती ट्रोल होत आहे.

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीमध्ये उर्वशी “मी दिल्लीला कामासाठी गेले होते. तेथे पोहचेपर्यंत रात्र झाली होती. दिल्लीला पोहचल्यावर मी तयार व्हायला गेले. तेव्हा ‘आरपी’ हॉटेलच्या लॉबीमध्ये माझी वाट पाहत होता. मला त्याचा एकही कॉल अटेंड करणं शक्य झालं नाही. काम संपवून झोपी गेले. या सर्व गोंधळात जवळपास दहा तास उलटले. जेव्हा मला जाग आली, तेव्हा मला १६-१७ मिस्ड कॉल दिसले. त्यावेळी मला खूप वाईट वाटले, कोणीतरी माझी वाट पाहत आहे आणि मी त्याला भेटू शकले नाही. त्यानंतर आम्ही मुंबईत भेटलो पण तिथेही गोंधळ झाला”, असे म्हणाली होती. या मुलाखतीमध्ये ती वारंवार ‘आरपी’ या नावाचा उल्लेख करत होती. त्यावेळी लोकांनी ‘आरपी’ म्हणजे ‘ऋषभ पंत’ असा अंदाज लावला.

shradhha kapoor boyfriend
श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवरील ‘ती’ व्यक्ती कोण? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Irfan Pathan Showed how Cameraman zoom on fans during live cricket match watch video
Irfan Pathan : लाइव्ह मॅचमध्ये चाहत्यांवर कसा झूम होतो कॅमेरा? इरफान पठाणने शेअर केला खास VIDEO
Marathi Actor Visited Maha Kumbh Mela 2025
“प्रयागराजच्या पवित्र भूमीवर…”, महाकुंभ मेळ्याला पोहोचला ‘हा’ मराठमोळा अभिनेता; नेटकरी म्हणाले, “भाग्यवान आहेस…”
Nitish Chavan
‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणने शेअर केला ईशा संजयबरोबर व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नाव सांगू का शीतलला?”
marathi actress Ashwini Chavare bold photos
ओले केस अन् गळ्यात फक्त नेकलेस, मराठी अभिनेत्रीचे बोल्ड फोटो पाहिलेत का?
jitendra Awhad Mahesh Vighne Walmik karad
Jitendra Awhad: ‘चौकशी करणारेच वाल्मिक कराडचे मित्र’, PSI बरोबरचे फोटो पोस्ट करत जितेंद्र आव्हाडांचे तपासावरच प्रश्नचिन्ह
Marathi Actress Rucha Vaidya Engagement
अडीच महिन्यांपूर्वी आदिनाथ कोठारेच्या चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण करणाऱ्या मराठी अभिनेत्रीने उरकला साखरपुडा, फोटो आले समोर

आणखी वाचा – ‘बाहुबली’ फेम राणा डग्गुबाती लवकरच होणार बाबा?, व्हायरल फोटोवर नेटकऱ्यांनी केला अभिनंदनाचा वर्षाव

उर्वशी रौतेला सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. ती इन्स्टाग्रामवर सतत काही ना काही पोस्ट करत असते. नुकताच तिने तेलुगू सुपरस्टार राम पोथीनेनीसह फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे तिने उल्लेख केलेला ‘आरपी’ ऋषभ पंत नसून ‘राम पोथीनेनी’ आहे अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. फोटोच्या कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच यूजर्सनी तिला “हाच तो आरपी आहे का?” असा प्रश्न केला आहे. रामसुद्धा सिंगल असल्यामुळे थोड्याच कालावधीमध्ये त्यांच्या अफेअरबद्दल सर्वत्र बोलले जात आहे.

आणखी वाचा – टेरेंस लुईसने नोरा फतेहीला चुकीच्या पद्धतीने केला स्पर्श? कोरियोग्राफर म्हणतो, “मला शिवीगाळ…

तेलुगू सिनेदिग्दर्शक बोयापती श्रीनु यांच्या आगामी चित्रपटामध्ये राम पोथीनेनी प्रमुख पात्र साकारणार आहे. या चित्रपटामध्ये उर्वशी एका आयटम सॉंगवर डान्स करणार असल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच हैदराबादमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

Story img Loader