सध्या आयपीएलचा हंगाम सुरू आहे. आयपीएलच्या १६व्या हंगामातील दिल्ली कॅपिटल्स व गुजरात टायटन्सदरम्यान पार पडलेल्या सामन्यादरम्यान क्रिकेटर ऋषभ पंतही स्टेडिअम दिसला. काही महिन्यांपूर्वी झालेल्या कार अपघातात ऋषभ थोडक्यात बचावला होता. गंभीर दुखापतीमुळे त्याला यंदाच्या आयपीएलमध्ये सहभागी होता आलं नाही.
गुजरात टायटन्सबरोबरच्या सामन्यात ऋषभ त्याची टीम दिल्ली कॅपिटल्सला प्रोत्साहन करताना दिसून आला. ऋषभ पंतला पाहून सामना बघायला आलेल्या एका चाहतीने पोस्टर झळकवलं होतं. “थँक गॉड, उर्वशी इथे नाहीये” असं त्या पोस्टरवर लिहिलं होतं. पोस्टर झळकवलेल्या या मुलीचा फोटो बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
हेही वाचा>> लग्नानंतर सहा वर्षांनी आई झालेल्या बिपाशाने पहिल्यांदाच शेअर केले लेकीचे गोड फोटो, म्हणाली “देवी…”
हेही वाचा>> ‘आदिपुरुष’मधील हनुमानाचा लूक समोर, प्रसिद्ध मराठी अभिनेता साकारणार भूमिका
उर्वशीने या फोटोला “का?” असं कॅप्शन देत प्रश्न विचारला आहे. उर्वशीच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. “ऋषभला नजर लागली असती,” असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “रौतेला असं तिने लिहिलेलं नाही, त्यामुळे इग्नोर कर,” अशी कमेंटही केली आहे.

“लक्ष वेधून घेण्यासाठी हे सगळं सुरू आहे, इग्नोर कर” असंही म्हटलं आहे. “उर्वशी अनेक मुलींचं नाव आहे, तुला फरक कशाला पडतो”, अशीही कमेंट केली आहे.

ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला काही वेळ एकमेकांना डेट करत होते. परंतु, नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. आता ऋषभ गर्लफ्रेण्ड ईशा नेगीसह रिलेशनशिपमध्ये आहे.