बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमी चर्चेत असते. चित्रपटात फारशा महत्त्वाच्या भूमिका करीत नसली तरी उर्वशी तिच्या फॅशन सेन्ससाठी आणि बोल्ड लूकसाठी कायम चर्चेत असते. आता एका नव्या कारणामुळे उर्वशी चर्चेत आली आहे. उर्वशीने मुंबईतील जुहू येथे नवीन बंगला खरेदी केला आहे. उर्वशीचा हा नवीन बंगला बॉलीवूडचे दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांच्या बंगल्याच्या शेजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. आदित्य चोप्रा यांच्या आई पामेला चोप्रा या आपल्या निधनापूर्वी या बंगल्यात राहत होत्या.
‘ई टाइम्स’ने दिलेल्या बातमीनुसार, गेले अनेक महिने उर्वशी आपल्या नव्या घराच्या शोधात होती. यापूर्वी उर्वशी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील ‘सेलेस्ट’ नावाच्या बंगल्यात राहायला जाणार होती. मात्र, काही कारणास्तव ती त्या बंगल्यात राहायला गेली नाही. आता उर्वशी तिच्या जुहूच्या नवीन बंगल्यात शिफ्ट झाली आहे. ज्याला अभिनेत्रीने खूप सुंदर सजवले आहे. उर्वशी दोन-तीन महिन्यांपूर्वीच या बंगल्यात शिफ्ट झाली आहे. बॉलीवूडचे दिवंगत दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या बंगल्याच्या शेजारी उर्वशीचा नवीन बंगला आहे. यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा या आपल्या निधनापूर्वी या बंगल्यात राहत होत्या. २० एप्रिलला पामेला चोप्रा यांचे निधन झाले.
हेही वाचा- आमिर खानच्या चित्रपटात काम करण्यास सलमान खानचा नकार; ‘हे’ कारण आलं समोर
उर्वशी रौतेला अलीकडेच ‘कान्स २०२३’ मध्ये सहभागी झाली होती. कान्समधील उर्वशीच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. कान्समधील उर्वशीच्या लूकचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. केवळ लूकमुळेच नाही तर उर्वशी कान्समध्ये परिधान केलेल्या मगरीच्या डिझाइनच्या नेकलेसमुळेही चर्चेत होती.