७६व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी हजेरी लावली. कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२३ मध्ये अनुष्का शर्मा, मानुषी छिल्लर, सारा अली खान, मृणाल ठाकूर, उर्वशी रौतेलाने हजेरी लावली होती. कान्स फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर बॉलिवूड अभिनेत्रींचा जलवा पाहायला मिळाला. या सगळ्यात उर्वशी रौतेलाच्या हटके लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

कान्स फेस्टिव्हलसाठी उर्वशीने गुलाबी रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला होता. बन हेअरस्टाइल व मेकअप असा ग्लॅमरस लूक उर्वशीने खास कान्ससाठी केला होता. याबरोबरच उर्वशीने गळ्यात मगरीचे डिझाइन असलेला नेकलेसही घातला होता. उर्वशीच्या या नेकलेसने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या हटके लूकवरुन उर्वशीला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
gold from woman dead body s neck was stolen
मृत्यूनंतरही परवड थांबली नाही, पार्थिव रुग्णालयात नेताना महिलेच्या गळ्यातील गंठण चोरीला
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
deadly fight going on between two highly venomous snakes Everyone shuddered to see this scene
व्हिडिओ: अत्यंत विषारी मण्यार सापांची थरकाप उडवणारी झुंज

हेही वाचा>> The Kerala Story : ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई, १२ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन कान्स फेस्टिव्हलमधील तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर कमेंट करत नेटकऱ्यांनी उर्वशीला लूकवरुन ट्रोल केलं आहे. “गळ्यातील पाल जिवंत झाली तर फोटोशूट सोडून पळून जाशील,” असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “ऋषभ पंतने रात्री ३ वाजता व्हिडीओ कॉलवर साप बघितला, म्हणून त्याचा अपघात झाला असावा,” अशी कमेंट केली आहे.

urvashi-rautela-troll

हेही वाचा>> परिणीतीचा शाही थाट! साखरपुड्यात अभिनेत्रीने राघव चड्ढाला घातली ‘इतक्या’ किमतीची अंगठी

“मगर का घातली आहे?” अशी कमेंटही केली आहे. “तू खूप सुंदर आहेस. पण, गळ्यात पाल का अडकवली आहेस?” असंही एकाने म्हटलं आहे.

urvashi-rautela-troll

कान्स फेस्टिव्हलमधील उर्वशी रौतेलाचा हा लूक सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिचे फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

Story img Loader