बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेला शाहरुख हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पठाण या चित्रपटामुळे चर्चेत आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीपासूनच सातत्याने चर्चेत होता. नुकतंच या चित्रपटाबद्दल उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी चित्रपट बॉयकॉट करण्याबद्दलही भाष्य केले.
पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यावरुन तो चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. यानंतर अनेक ठिकाणी शाहरुख खानचे पुतळे जाळण्यात आले होते. तसेच चित्रपटगृहांचीही तोडफोड करण्यात आली होती. यानंतर सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील काही सीनला कात्री लावत तो चित्रपटगृहात प्रदर्शित कोला. आतापर्यंत या चित्रपटाने ३९८ कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या चित्रपटाने ७३० कोटींचा गल्ला जमवला आहे. नुकतंच आजतकला दिलेल्या मुलाखतीत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या चित्रपटाबद्दल थेट मत व्यक्त केले.
आणखी वाचा : शाहरुख खानच्या ‘पठाण’ची ४०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; ‘केजीएफ २’ आणि ‘बाहुबली’चा रेकॉर्ड तोडण्यास किंग खान सज्ज
“माफ करा, मला अजून तरी हा चित्रपट पाहता आलेला नाही आणि मुख्य म्हणजे माझ्याकडे चित्रपट पाहण्याकरिता तितका वेळही नाही. मी कलाकारांचा आदर करतो. मी लेखकांचा आदर करतो. ज्याच्याकडे विशेष कौशल्य आहे त्याला आम्ही पूर्ण आदर देतो. पण आमच्याकडे चित्रपट पाहण्याइतका वेळ नाही. पण आम्ही कलाकार, लेखक आणि विशेष टॅलेंट असलेल्या लोकांचा कायमच शासकीय स्तरावर आदर करतो”, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
यानंतर योगी आदित्यनाथ यांना चित्रपटाच्या बॉयकॉट ट्रेंडबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी त्यांचे मत मांडले. “उत्तर प्रदेशात या चित्रपटाला कुठेही विरोध झाला नाही. एका ठिकाणी याबद्दल वाद झाला होता. पण तिथे एक प्रेक्षक या चित्रपटाचा रिल व्हिडीओ बनवत होता. पण चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांनी त्याला अडवले आणि हा वाद निर्माण झाला. या व्यतिरिक्त इतर कोणताही वाद झालेला नाही.”
आणखी वाचा : Video : सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीची लगीनघाई, सूनबाईंबद्दल प्रश्न विचारताच आईने केले असं काही…
“पण जेव्हा जेव्हा आपण चित्रपट निर्मिती करतो, त्यावेळी आपण लोकांच्या भावनांचा आदर करायला हवा. या चित्रपटाच्या सादरीकरणाबरोबरच लोकांच्या भावनाही महत्त्वाच्या आहेत. त्याबद्दल आदर असणं गरजेचे आहे. लोकांच्या भावनां दुखावल्या जातील, अशा कोणत्याही गोष्टी करण्याची परवानगी कोणालाही देऊ नये”, असेही ते म्हणाले.