अमिताभ बच्चन, बोमन इराणी, अनुपम खेर आणि डॅनी डेन्जोंगपा स्टारकास्ट असलेल्या ऊंचाई चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच बॉलिवूडमधील इतके दिग्गज कलाकार काम करणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या ‘ऊंचाई’ या चित्रपटाचे नवे पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केले. या पोस्टरद्वारे या चित्रपटातला त्यांचा लूक समोर आला होता.

दिग्दर्शक सुरज बडजात्या हे बऱ्याच वर्षांनी दिग्दर्शक म्हणून समोर येणार आहेत. सुरज बडजात्या आणि सलमान खान असं एक वेगळे समीकरण आहे. ‘मैने प्यार किया’ चित्रपटापासून त्यांची जोडी प्रसिद्ध आहे. या चित्रपटासाठी त्यांनी सलमानला घेतले नाही. याबाबत त्यांनीच माध्यमांशी बोलताना खुलासा केला की, ‘या चित्रपटासाठी मी सर्व बंधनं तोडली. एक काळ होता जेव्हा प्रेम ही व्यक्तिरेखा चालून जायची मात्र या चित्रपटासाठी मी सगळी बंधनं तोडली आहेत. मी जेव्हा सलमानला हा चित्रपट करतोय असे सांगितले तेव्हा तो म्हणाला तू हा चित्रपट का बनवत आहेस? मात्र नंतर तोच म्हणाला मी हा चित्रपट करण्यासाठी तयार आहे. पण मीच त्याला नकार दिला कारण मला वेगळे कलाकार घ्यायचे होते’.

Chhaava Movie New Release Date
तारीख ठरली! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपट; विकी कौशल म्हणाला, “३४४ वर्षांनंतर…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
kangana ranaut emergency movie ban in bangladesh
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बांगलादेशने घातली बंदी, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
Arvind Pilgaonkar passed away, Veteran singer-actor Arvind Pilgaonkar, Arvind Pilgaonkar ,
ज्येष्ठ गायक – अभिनेते अरविंद पिळगावकर यांचे निधन
kartik aaryan got degree after 10 years
Video : कार्तिक आर्यनला दहा वर्षानंतर मिळाली इंजिनिअरिंगची पदवी; व्हिडीओ शेअर करत अभिनेता म्हणाला, “बॅकबेंचरपासून ते…”
Sangeet Manapmaan Movie Review in marathi
नावीन्यपूर्ण अनुभव देणारा चित्रप्रयोग

बॉलिवूडच्या तीन खानपैकी कोण आवडतो? कतरिना कैफ म्हणाली, “चित्रपटाच्या सेटवर.. “

सुरज बडजात्या आणि सलमान खान यांनी शेवटचे एकत्र काम ‘प्रेम रतन धनो पायो’ या चित्रपटात केले होते. त्याआधी ‘हम आपके है कौ’न, ‘हम साथ साथ हैं’ यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यांच्या प्रत्येक चित्रपटात प्रेम नावाची व्यक्तिरेखा असतेच. नीना गुप्ता, सारिका, परिणीती चोप्रा यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. ११ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाची कथा ६० वर्षं पार केलेल्या ४ मित्रांच्या भोवती लिहिली गेली आहे. या ४ पैकी एका मित्राचं निधन होतं, आणि केवळ त्या मित्राची इच्छा पूर्ण करण्यासाठी उरलेले तिघे मित्र हे माऊंट एव्हरेस्ट शिखर चढायचं ठरवतात. असं एकंदर या चित्रपटाचा ट्रेलर बघून अंदाज येत आहे. प्रेक्षकांनी या ट्रेलरला पसंती दर्शवली असून प्रेक्षक या मुरलेल्या कलाकारांना एकत्र पडद्यावर बघण्यासाठी उत्सुक आहेत.

Story img Loader