Vanvaas Box Office Collection Day 1 : ‘गदर’ आणि ‘अपने’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी दिग्दर्शित केलेला ‘वनवास’ चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा आणि नाना पाटेकर हे दोघेही या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. ‘वनवास’ चित्रपट शुक्रवारी (२० डिसेंबर) प्रेक्षकांच्या भेटीला आला.
अल्लू अर्जुनचा चित्रपट ‘पुष्पा 2’ आधीच थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. त्याच दरम्यान ‘वनवास’ रिलीज झाला. त्याचबरोबर हॉलीवूड चित्रपट ‘मुफासा’ही रिलीज झाला आहे. दोन मोठ्या चित्रपटांबरोबर प्रदर्शित झालेल्या ‘वनवास’ला पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा फार चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. पुष्पा 2 व मुफासाची कमाई चांगली आहे. त्यामुळे त्या मोठ्या चित्रपटांबरोबर प्रदर्शित झाल्याचा फटका या सिनेमाला बसल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे. ‘वनवास’ चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कमाई केली हे जाणून घेऊया.
हेही वाचा – नाना पाटेकर यांच्या पत्नीला पाहिलंत का? फक्त ७५० रुपयांत केलेलं लग्न; ‘अशी’ झालेली दोघांची पहिली भेट
नाना पाटेकरांच्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी फार चांगली कमाई केलेली नाही. चित्रपटाला एक कोटीही कमावता आले नाही. चित्रपटाची ओपनिंग निराशाजनक राहिली आहे. सॅकनिल्कने दिलेल्या आकडेवारीनुसार, ‘वनवास’ने पहिल्या दिवशी ६० लाख रुपये कमावले आहेत. ही प्रारंभिक आकडेवारी आहे.
हेही वाचा – बराक ओबामा यांचे २०२४ मधील आवडते चित्रपट, यादीत पहिल्या क्रमांकावर आहे ‘हा’ भारतीय सिनेमा
या चित्रपटाला समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाची कथा वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारित आहे. कुटुंबासमवेत पाहण्यासारखा हा चित्रपट आहे. ‘वनवास’ चित्रपटाच्या निर्मितीसाठी जवळपास ३० कोटी रुपयांचा खर्च निर्मात्यांनी केला आहे. या चित्रपटाची सुरुवात फार चांगली झालेली नाही; पण शनिवार व रविवारी वीकेंडला याच्या कमाईत वाढ होण्याची शक्यता आहे. वीकेंडला हा चित्रपट किती कमाई करतो, याकडे निर्मात्यांचं लक्ष लागलं आहे.
‘वनवास’मध्ये कलाकारांची मांदियाळी
‘वनवास’मध्ये नाना पाटेकर, उत्कर्ष शर्मा, सिमरन कौर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सहाय्यक कलाकारांमध्ये खुशबू सुंदर, सिमरत कौर, राजपाल यादव, अश्विनी काळसेकर, परितोष त्रिपाठी, मनीष वाधवा आणि राजेश शर्मा यांचा समावेश आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले असून निर्मिती सुमन शर्मा यांनी केली आहे.