‘बेबी जॉन’ या आगामी हिंदी सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून या सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली होती. नुकतंच वरुण धवन, वामिका गब्बी, अ‍ॅटली आणि निर्माता मुराद खेतानी आणि प्रिया अटली यांच्या उपस्थितीत या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

कालीस यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून या ट्रेलरमध्ये अ‍ॅक्शन, मनोरंजन, क़ॉमेडी आणि डान्सच्या जबरदस्त ट्रॅकचा दमदार कॉम्बिनेशन आहे. प्रसिद्ध संगीतकार एस. थमन यांनी दिलेले संगीत आणि पार्श्वसंगीत (बीजीएम) ट्रेलरला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”
Raveena Tandon daughter Rasha Thadani Uyi Amma In Azaad watch video
Video: रवीना टंडनच्या १९ वर्षीय मुलीचं Uyi Amma गाणं प्रदर्शित; राशाच्या जबरदस्त डान्सने वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “आईचं नाव…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “मैदानच मोकळं…”, सूर्याची बहीण संकटात सापडणार; प्रोमो पाहिल्यानंतर नेटकरी म्हणाले, “चुकीचा संदेश…”
Navri Mile Hitlarla
Video : ‘नवरी मिळे हिटलरला’मधील ‘या’ जोडप्याने ‘हैला हैला’ गाण्यावर धरला ठेका; नेटकरी कौतुक करीत म्हणाले, “हृतिक आणि प्रीती…”

हेही वाचा…बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…

या सिनेमाविषयी व्यक्त होताना वरुण धवन म्हणाला की, “’बेबी जॉन’चा मी एक भाग होता आला मला खूप आनंद आहे. हा सिनेमा खूपच भावनिक आहे आणि स्टोरीलाईन बद्दल म्हणायचं तर हा सिनेमाच खूप पॉवरफुल जर्नी आहे. यामधील पात्रं साकारण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. ट्रेलरमध्ये या कथेची तीव्रता आणि झलक पाहायला मिळते. या प्रोजेक्टवर काम करणे खरोखरच खास होतं.” या ट्रेलर वरुण धवनच्या लॉन्चला वरूण धवनच्या दमदार एन्ट्रीने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले, तर आधीच लोकप्रिय ठरलेल्या ‘नैन मटक्का’ गाण्यावर त्याने वामिका गब्बीसह केलेल्या भन्नाट डान्स मूव्ह्जनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.

‘जवान’ सिनेमाचा दिग्दर्शक आणि या सिनेमाचा निर्माता (प्रेजेंटर)अ‍ॅटली म्हणाला, “बेबी जॉन हा सिनेमा खूप महत्त्वाची आणि आजच्या काळाला साजेशी कथा मांडतो. हा एक मनोरंजनपूर्ण कौटुंबिक सिनेमा आहे, हा सिनेमा महिलांच्या सुरक्षेसारख्या गंभीर विषयांवरही प्रकाश टाकतो, आजच्या हा समाजासाठी मोठ्या चिंतेचा विषय आहे. या अर्थपूर्ण प्रोजेक्टचा भाग होऊन मला खूप अभिमान वाटतो.”

हेही वाचा…‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…

‘बेबी जॉन’या सिनेमात वरुण धवन, राष्ट्रीय पुरस्कार विजेती कीर्ती सुरेश, वामिका गब्बी, जॅकी श्रॉफ आणि राजपाल यादव यांच्या प्रमुख भूमिकांमुळे चर्चेत आहे. मुराद खेतानी, प्रिया अटली आणि ज्योती देशपांडे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. अटली आणि सिने1 स्टुडिओज यांच्या सहकार्याने जिओ स्टुडिओजने प्रस्तुत केला आहे, कालीस यांनी दिग्दर्शित केलेला ‘बेबी जॉन’ २५ डिसेंबर २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader