अभिनेता वरुण धवन आणि क्रिती सेनॉन गेले अनेक दिवस त्यांच्या ‘भेडिया’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्या दोघांचे चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. त्याचा आगामी ‘भेडिया’ चित्रपट ट्रेलरवरून तरी अॅक्शन आणि कॉमेडी वाटत आहे. या चित्रपटाचे रिलीज आता काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. अशातच सध्या वरुण धवन आणि क्रिती सेनॉन या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत.
वरुण-क्रिती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडू इच्छित नाहीत. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान ते फार मेहनत घेत आहेत. नुकतेच दोघेही मुंबईच्या रस्त्यावर एकत्र बाइक चालवताना दिसले. या त्यांच्या बाईक राईडचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात वरुण बुलेट चालवताना दिसत आहे, तर क्रिती त्याच्या मागे बसलेली दिसत आहे. या बाईक राईडदरम्यान वरुणने काळ्या जॅकेट घातले आहेत तर क्रितीने ब्लू जीन्स आणि टॉप परिधान केला आहे. या दोघांना बाईकवर बघून मुंबईकर आश्चर्याचकित झाले. वरुण आणि क्रिती आपल्या बाजूला बाईकवर एकत्र दिसणं हे त्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या सर्वांसाठीच सरप्राईज होतं.
आणखी वाचा : अभिनेत्री नव्हे तर ‘या’ प्रसिद्ध भारतीय महिला बॉक्सरबरोबर सलमान खान झाला रोमँटिक; व्हिडीओ व्हायरल
हे दोघे मोठ्या गॅपनंतर स्क्रिन शेअर करणार आहेत. त्यामुळे या जोडीचे चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. यापूर्वी वरुण आणि क्रिती ‘दिलवाले’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. शाहरुख-काजोल ही सदाबहार जोडी या चित्रपटात मुख्य भूमिकेत होती. दिलवाले चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. शाहरुख-काजोल बरोबरच वरुण क्रिती यांची जोडीही हिट झाली होती. आता त्यांना आपली तशीच छाप प्रेक्षकांवर पाडायची आहे.
हेही वाचा : वरुण धवनने व्यक्त केली दक्षिणात्य चित्रपटांत काम करण्याची इच्छा; म्हणाला, “बॉलिवूडमध्ये आता…”
दरम्यान, ‘भेडिया’ हा हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे. हा चित्रपट २५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या संदर्भात वरुण-क्रिती सध्या खूप व्यस्त आहेत. आता या दोन्ही स्टार्सचे चाहते २५ नोव्हेंबरची वाट पाहत आहेत.