अभिनेता वरुण धवन आणि क्रिती सेनॉन गेले अनेक दिवस त्यांच्या ‘भेडिया’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्या दोघांचे चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. वरुण आणि क्रितीदेखील सेटवरील फोटो पोस्ट करत वेळोवेळी चाहत्यांना चित्रपटाचे अपडेट्स देत होते. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील त्या दोघांचे लूक्स समोर आले होते. तसेच या चित्रपटाच्या टीझरलाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यापाठोपाठ आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

आणखी वाचा : ‘जेम्स बाँड’ची भूमिका साकारणारा अभिनेता डॅनियल क्रेगचा रॉयल फॅमिलीकडून सन्मान; कारण…

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

या ट्रेलरची सुरुवात घनदाट जंगलातून होते. वरुण धवनला एक लांडगा चावल्याने त्याचे रूपांतर हळूहळू लांडग्यात होते आणि तो विचित्र गोष्टी करू लागतो. त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी क्रिती सेनॉन शर्थीचे प्रयत्न करताना दिसते. मग त्यातून पुढे काय काय गोष्टी घडतात आणि तो बरा होतो की नाही हे या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या चित्रपटात क्रिती सेनॉन डॉक्टर अनिकाच्या भूमिकेत आहे. हा बहुप्रतिक्षित ट्रेलर वरुण धवनने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. तो पोस्ट करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “या कथेचे नाव #भेडिया आहे!”

ट्रेलरमध्ये अॅक्शनसोबतच कॉमेडीचेही जबरदस्त मिश्रण दिसून येत आहे. हा ट्रेलर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या ट्रेलरवर नेटकरी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत. तो पाहिल्यानंतर एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले, “जंगल-जंगल बात चली है.” दुसऱ्याने लिहिले. ‘अप्रतिम ट्रेलर आणि अप्रतिम VFX.’ तर आणखी एक नेटकरी म्हणाला, “अखेर प्रतीक्षा संपली…ट्रेलर अप्रतिम आहे.”

हेही वाचा : Bhediya Teaser : वरुण धवनच्या ‘भेडिया’चा अंगावर काटा आणणारा टीझर प्रदर्शित, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

‘भेडिया’ हा चित्रपट पुढच्या महिन्यामध्ये बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे. वरुण, क्रिती यांच्यासह दीपक डोबरियाल आणि अभिषेक बॅनर्जी हे कलाकार या चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट विनोदी भयपट शैलीतला असून त्याचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे. हा चित्रपट २५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader