आलिया भट्ट व वरुण धवन या दोघांनीही बॉलिवूडमध्ये त्यांच्या करिअरची सुरुवात एकत्र केली होती. त्यांनी करण जोहरचा ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. वरुण व आलिया दोघांनीही त्यांच्या अभिनयाने इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. दोघेही चांगले मित्र आहेत व वरुण आलियाला टोपणनावाने हाक मारतो.
नुकत्या एका पत्रकार परिषदेत या दोघांच्या मैत्रीची झकल पाहायला मिळाली. तसेच यावेळी वरुणने आलिया भट्टच्या टोपणनावांबद्दल खुलासा केला. वरुण म्हणाला, “तिची बरीच टोपणनावं आहेत. ‘स्टुडंट ऑफ द इयर’च्या वेळी मी तिला अलू म्हणायचो. नंतर बराच काळ मी तिला आमिर खान म्हणायचो, कारण जेव्हा ती २०-२१ वर्षांची होती, तेव्हा तिचा ड्रेसिंग सेन्स आमिर खानसारखाच होता. ती हाय वेस्ट जीन्स घालायची आणि शॉर्ट्समध्ये टक करायची. तिचा स्वॅग आमिर खानसारखा होता आणि ती एक परफेक्शनिस्ट देखील आहे.”
हेही वाचा- “खेल खतम, पैसा हजम?”, ब्लू टिकवरून अमिताभ बच्चन यांची ट्विटरवर टीका; म्हणाले, “मी पैसे भरले अन्…”
वरुण-आलियाने ‘स्टुडंट ऑफ द इयर’नंतर ‘कलंक’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यानंतर पुन्हा दोघेही एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसले नाहीत. अशातच दोघेही पुन्हा एकत्र कधी काम करणार, असा प्रश्न विचारल्यावर आलिया म्हणाली, “वरूण खूप व्यग्र आहे, त्याच्याकडे तारखा नाहीत.” यावर वरुणने गमतीशीर उत्तर दिले, “हो मी खूप व्यग्र आहे, मला नुकतेच बाळ झाले आहे.” यानंतर आलिया म्हणाली, “आम्ही यावर अनेकदा चर्चा केली आहे. आम्ही जेव्हा जेव्हा एकत्र काम केलं, तेव्हा खूप मजा आली, त्या चित्रपटांनी चांगली कमाई केली. एखादा चांगला प्रोजेक्ट मिळाल्यास आम्ही नक्कीच एकत्र काम करू.”