बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांच्या यादीत वरुण धवन याचं स्थान टॉप १० मध्ये येतं. त्याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्याच्या कामाबरोबर असतो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. तो काय करतो, कसा वागतो याकडे अनेकांचं लक्ष असतं. पण आता त्याच्या एका कृतीमुळे नेटकरी त्याच्यावर संतापले आहेत.

गेले अनेक दिवस नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची सर्वत्र चर्चा होती. तर नुकताच या कल्चरल सेंटरचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या उद्घाटन सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. तर या कार्यक्रमात वरुण धवनही उपस्थित होता. इतकंच नाही तर त्याने यावेळी एक परफॉर्मन्स देखील दिला. पण स्टेजवर त्याने परदेशी अभिनेत्रीबरोबर केलेल्या एका कृतीमुळे तो चांगलाच ट्रोल होत आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल

आणखी वाचा : Video: “आईला मान खाली घालायला लावली…” चारचौघात काजोलबरोबर केलेल्या ‘त्या’ वागणूकीमुळे न्यासा देवगणवर नेटकरी नाराज

वरुण धवनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन सोहळ्याला फक्त बॉलिवूड नाही तर अनेक हॉलिवूड स्टार्सनी देखील हजेरी लावली. अमेरिकन अभिनेत्री गिगी हदीदही या कार्यक्रमाला उपस्थित होती. वरुणने त्याच्या परफॉर्मन्स दरम्यान गिगीला हाताला धरून स्टेजवर आणलं. ती स्टेजवर येताच त्याने तिला उचललं आणि गोल फिरवलं. इतकंच नाही तर त्याने तिला गालावर किसही केलं. त्याचा हा अंदाज कोणालाही आवडला नाही.

हेही वाचा : Video: नीता अंबानींच्या कार्यक्रमात शाहरुख खानने दाखवला जलवा, वरुण व रणवीर सिंगच्या साथीने दिला धमाकेदार परफॉर्मन्स

या व्हिडीओवर आता नेटकरी विविध प्रतिक्रिया देत त्यांची नाराजी व्यक्त करत आहेत. एकाने लिहिलं, “तुला तिला किस करण्याची काही गरज होती?” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “हे सगळं करण्याच्या आधी तू तिची परवानगी घेतली होतीस?” तर आणखी एकाने लिहिलं, “हे करण्याची काय गरज होती? तू सेलिब्रिटी असशील पण ती तिथे पाहुणी म्हणून आली होती. परवानगी घेणं हे आवश्यक होतं.” तर एकजण म्हणाला, “ती एक सेलिब्रिटी आहे. तुझी बायको नाही.” तर याचबरोबर आणखी एकाने लिहिलं, “म्हणून भारतात कोणीही सेलिब्रिटी येण्यास इच्छुक नसतात.” तर या कृतीमुळे आता वरुणवर चहू बाजूंनी टीका होत आहे.

Story img Loader