अभिनेता वरुण धवन आणि क्रिती सेनॉन गेले अनेक दिवस त्यांच्या ‘भेडिया’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्या दोघांचे चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. त्याचा आगामी ‘भेडिया’ हा चित्रपट अॅक्शन आणि कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाचे रिलीज आता काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. अशातच सध्या वरुण धवन आणि क्रिती सेनॉन या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत.

वरुण-क्रिती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडू इच्छित नाहीत. पण हे करताना ते दोघेही त्यांचे सामाजिक भान जपत आहेत. वरुण हा जितका चांगला अभिनेता आहे तितकाच चांगला माणूसही आहे. ज्यांना मदतीची गरज असेल त्यांना मदत करण्यासाठी वरुण नेहमीच पुढे असतो. यापूर्वी त्याने अनेक कार्यक्रमात तो किती सुजाण नागरिक आहे हे त्याने दाखवून दिलं आहे. आताही या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्याची ही बाजू सगळ्यांसमोर आली.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
little girl lavni dance in nauvari saree on marathi song Mala Pirtichya Jhulyat Jhulwa video goes viral
“मला पिरतीच्या झुल्यात झुलवा अन् इश्काचा गुलकंद खिलवा” गाण्यावर चिमुकलीची जबरदस्त लावणी; काय ती ‘कातील अदा’ VIDEO एकदा पाहाच
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?
a young girl amazing dance on a stage Her face expression
Video : तरुणीने केला एक नंबर डान्स! चेहऱ्यावरील हावभाव आणि ऊर्जा पाहून नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…

आणखी वाचा : बालदिनाच्या दिवशी करण जोहर घेऊन आला लोकप्रिय ‘डिस्को दिवाने’ गाण्याचं नवीन व्हर्जन, व्हिडीओ व्हायरल

वरुण आणि क्रिती नुकतेच भेडिया या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने जयपूरला गेले होते. तेथे ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. तसेच महाविद्यालयांना त्यांनी भेट दिली. वरुण आणि क्रिती आपल्या कॉलेजमध्ये येणार हे कळताच विद्यार्थ्यांनी खूप गर्दी केली होती. अनेकजण तर सकाळपासून रांगेत थांबले होते. अशातच वरुण आणि क्रिती या चित्रपटाचे प्रमोशन करत असताना एका विद्यार्थिनीला चक्कर आली आणि ती जमिनीवर कोसळली.

हेही वाचा : वरुण धवनने व्यक्त केली दक्षिणात्य चित्रपटांत काम करण्याची इच्छा; म्हणाला, “बॉलिवूडमध्ये आता…”

आपली चाहती चक्कर येऊन जमिनीवर कोसळलेली पाहताच वरुणने तो कार्यक्रम थांबवायला सांगितला. इतकच नाही तर त्याने तिला पाणीही दिले. तिला बरे वाटेपर्यंत तो तिथेच होता. ती शुद्धीवर आल्यावर त्याने तिची चौकशीही केली. तिला बरं वाटतं आहे हे कळल्यावरच त्याने पुढील कार्यक्रमाला सुरुवात केली. वरुणचे या दरम्यानचे काही फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून सर्वजण वरुणाच्या या कृतीचे कौतुक करत आहेत.

Story img Loader