बॉलीवूड अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांनी २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. हे दोघे बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करीत होते. वरुण पत्नी नताशाबरोबरचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असतो. दरम्यान, गेले काही दिवस सोशल मीडिया स्टार कुशा कपिला आणि वरुणची पत्नी नताशा या दोघीही थोड्याफार सारख्याच दिसतात अशा चर्चा सुरु होत्या. नेटकऱ्यांच्या या चर्चांना उत्तर देताना कॉमेडी क्वीन कुशा कपिलाने एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा : विकी-साराची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली; ‘जरा हटके जरा बचके’चित्रपटाने दोन दिवसांत जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ
Maharashtra need Chhatrapati Shivaji Maharaj
Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”
Sakhi Gokhale and suvrat joshi dance on shahrukh khan lutt putt gaya song
Video: सखी गोखले-सुव्रत जोशीचा पहाटे २ वाजता शाहरुख खानच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

कुशाने थेट वरुणबरोबर व्हिडीओ बनवत आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला कुशा वरुणला धडकते, दोघेही बराच वेळ एकमेकांकडे पाहतात आणि गोंधळलेले दिसतात, अर्थात याठिकाणी वरुण सुद्धा पत्नी नताशासारख्या दिसणाऱ्या मुलीला पाहून गोंधळला आहे असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा : छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर; बॉलीवूडचा ‘हा’ अभिनेता साकारणार शंभूराजांची भूमिका

कुशाने या व्हिडीमध्ये असंख्य युजर्सच्या “नताशा आणि तू सारखी दिसतेस…” सांगणाऱ्या कमेंट्सचे स्क्रिनशॉट्स जोडले आहेत. यामध्ये अनेक युजर्स तिला “नताशा दलालची हुबेहूब कॉपी”, “जुडवा २ इन रिअल लाईफ” असे म्हणत आहेत. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये नमूद करत कुशाने वरुण धवनचे आभार मानले आहेत. कुशाने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान, कुशा कपिला ही प्रसिद्ध इन्स्टाग्राम क्रिएटर म्हणून ओळखली जाते. तिचे एक यूट्यूब चॅनेल देखील आहे आणि इंस्टाग्रामवर कुशाचे तब्बल ३.३ मिलियन फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर कुशा नेहमीच असे मजेदार व्हिडीओ शेअर करत आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करीत असते. दुसरीकडे, वरुण धवन सध्या सिटाडेल या वेब सीरिजमध्ये व्यस्त आहे.

Story img Loader