Varun Dhawan Natasha Dalal Daughter Name: वरुण धवन आणि नताशा दलाल जून २०२४ मध्ये आई-बाबा झाले. त्यांनी ३ जून रोजी त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. त्यांना मुलगी झाली, मात्र मुलीचं नाव काय ठेवलं हे वरुण व नताशा यांनी सांगितलं नव्हतं. आता वरुणने आपल्या लाडक्या लेकीच्या नावाबद्दल खुलासा केला आहे. नताशा व वरुण यांनी आपल्या मुलीचं नाव खूपच खास ठेवलं आहे. तिच्या नावाचं माजी मिस युनिव्हर्स व बॉलीवूड अभिनेत्री लारा दत्ताच्या नावाशी साम्य आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वरुणने नुकतीच अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती 16’ मध्ये हजेरी लावली. ‘सिटाडेल: हनी बनी’ या सीरिजच्या प्रमोशनसाठी तो या शोमध्ये आला होता. या शोमध्ये त्याने आपल्या मुलीचं नाव सांगितलं. त्याने केबीसीमध्ये मुलीसाठी एक अंगाईगीत गायलं. नंतर तो म्हणाला की त्यांनी मुलीचं नाव लारा ठेवलं आहे.

लारा नावाचा अर्थ काय?

Meaning of Lara: ‘लारा’ हा लॅटिन, ग्रीक आणि रशियन शब्द आहे. सुंदर, लोकप्रिय आणि तेजस्वी असे वेगवेगळे या नावाचे अर्थ आहेत. तसेच वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत.

हेही वाचा – ‘फँड्री’ फेम राजेश्वरी खरातने हळदीचा फोटो शेअर केल्यावर सोमनाथच्या रोमँटिक पोस्टने वेधलं लक्ष

शोच्या दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन म्हणाले की धवन कुटुंबासाठी यंदाची दिवाळी आणखी खास आहे कारण त्यांच्या घरी नवीन सदस्याचं आगमन झालं आहे. “वरुण, ही दिवाळी तुझ्यासाठी खूप खास आहे, कारण तुझ्या घरी लक्ष्मीचे आगमन झाले आहे”, असं बिग बी म्हणाले. त्यानंतर वरुणने हात जोडून त्यांचे आभार मानले.

हेही वाचा – ऐश्वर्या राय बच्चनचे इन्स्टाग्रामवर १४.३ मिलियन फॉलोअर्स, ती फक्त ‘या’ एकाच व्यक्तीला करते फॉलो

या शोमध्ये वरुणने अमिताभ बच्चन यांच्याकडे पालकत्वाचा सल्लाही मागितला. अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन लहान होते तेव्हा त्यांची काळजी घेण्यासाठी कधी रात्री जागावं लागलंय का, असं वरुणने विचारल्याव बिग बी म्हणाले, “मी तुला एकच गोष्ट सांगेन की तुझ्या पत्नीला आनंदी ठेव, ती आनंदी असेल तर तुमच्या आयुष्यात सगळं चांगलं होईल. सुखी आयुष्याचा हा एकच फॉर्म्युला आहे.”

हेही वाचा – पहिल्या रिलेशनशिपमधून ५ वर्षांचा मुलगा, दोन महिन्यांपूर्वी लग्न करणारी बॉलीवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई

तीन वर्षांपूर्वी वरुण-नताशाने केलं लग्न

२४ जानेवारी २०२१ ला वरुण व नताशा लग्नबंधनात अडकले होते. फक्त ५० लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला अलिबागच्या द मॅन्शन रिसॉर्टमध्ये पार पडला होता. वरुण व नताशा लहानपणापासूनचे मित्र आहेत. लग्नाआधी दोघांनी बरीच वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. लग्नानंतर तीन वर्षांनी दोघे आई-बाबा झाले. त्यांच्या मुलीचे नाव लारा आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varun dhawan natasha dalal daughter name is lara meaning hrc