सध्या बॉलीवूड चित्रपटांची चांगलीच रेलचेल आहे. अनेक बड्या बॉलीवूड चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा क्लॅश होताना दिसत आहेत. त्यामुळे ही टक्कर टाळण्यासाठी अनेक निर्मात्यांनी त्यांचा चित्रपट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता यात वरुण धवनही सामील झाला आहे.

वरुण धवन आणि करण जोहर यांच्यात गुरु-शिष्याचं नातं आहे. करण जोहरने त्याच्या ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ या चित्रपटातून वरुण धवनला ब्रेक दिला. हा चित्रपट सुपरहिट ठरला. आतापर्यंत कधीही वरुणने करणच मन दुखावलेलं नाही. अशातच आता त्यांनी करण जोहरसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Kiran Mane
“डोळ्यात पाणी आलं…”, किरण माने यांनी सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाले, “माझ्यासारख्या मराठी अभिनेत्याला…”
Walmik Karad Mother Parubai Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “आता मी मेल्यावर पाणी पाजायला…”
Ashwini Deshmukh
Santosh Deshmukh : “संतोष देशमुखांना भीती वाटत होती, गुंड प्रवृत्तीचे लोक…”, हत्येच्या दोन दिवस आधी काय घडलं? पत्नीने सांगितला घटनाक्रम!
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”
veer pahariya varun dhawan body double bhediya
वरुण धवनच्या ‘या’ सिनेमात बॉडी डबल म्हणून केलं काम, आता मुख्य भूमिकेत पदार्पण करणार ‘हा’ अभिनेता
Gautam Gambhir Statement on Jasprit Bumrah and Sam Konstas Fight in Sydney test IND vs AUS
IND vs AUS: “त्याचं काही घेणं देणं नव्हतं…”, गौतम गंभीरने सॅम कॉन्स्टासला सुनावले खडे बोल, जसप्रीतबरोबर घातला होता वाद

आणखी वाचा : Video: आधी उचललं, मग किस केलं अन्…; भर कार्यक्रमात गिगी हदीदबरोबर केलेल्या ‘त्या’ कृतीमुळे वरुण धवनवर नेटकरी नाराज

वरुण धवन गेले काही दिवस त्याच्या ‘बवाल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच तो आणि अभिनेत्री जान्हवी कपूर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. हा चित्रपट २७ जुलै रोजी ‘ॲमेझॉन प्राईम’वर प्रदर्शित होणार होता. पण आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. आता हा चित्रपट २७ जुलै च्या ऐवजी २१ जुलै रोजी ओटीटीवर प्रदर्शित होईल. याचे मुख्य कारण म्हणजे २८ जुलै रोजी करण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या दोन चित्रपटांमध्ये स्पर्धा निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा : “तू काहीही कर पण ‘हे’ नको…” रणवीर सिंगचा वरुण धवनला मोलाचा सल्ला

मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यासाठी वरुण धवनने चित्रपटाच्या टीमला तयार केलं. त्यामुळे आता या दोन चित्रपटांमध्ये होणारी टक्कर थांबवण्यात आली आहे. तर आता अखेरीस वरून धवनचा ‘बवाल’ हा चित्रपट २१ जुलैला आणि करण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट २८ जुलैला प्रदर्शित होईल.

Story img Loader