अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या आयुष्यात सोमवारी (३ जून रोजी) एका गोंडस मुलीचं आगमन झालं. नुकताच बाबा झालेल्या वरुण धवनने आता त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत ही गुड न्यूज चाहत्यांना दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वरुणने इन्स्टाग्रामवर एक ग्राफिक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत त्याने लिहिलं, “आम्हाला मुलगी झाली आहे. आई आणि बाळासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।”

वरुणने दिलेल्या गुड न्यूजसाठी अनेक कलाकारांनी कमेंट्स करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. करीना कपूरने कमेंट करत लिहिलं, “देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. खूप अप्रतिम बातमी दिलीस.” तर अभिषेक बच्चनने कमेंट करत लिहिलं, “किती छान बातमी आहे, अभिनंदन.”

“अभिनंदन.. तुम्हा तिघांसाठी खूप खूप प्रेम”, अशी कमेंट रकुल प्रीतने केली; तर समंथा रुथ प्रभू, अरमान मलिक, प्रियांका चोप्रा, परिणीती चोप्रा, सान्या मल्होत्रा, शर्वरी, बिपाशा बासू अशा अनेक कलाकारांनी वरुण आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा… अखेर शर्मीन सेगलने ‘हीरामंडी’मधील अभिनयासाठी होणाऱ्या ट्रोलिंगवर सोडलं मौन, म्हणाली, “प्रेक्षकांचं मत तुम्हाला…”

याआधी चित्रपट निर्माता करण जोहरने त्याच्या सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत आपला आनंद व्यक्त केला. करणने लिहिलं, “माझ्या बेबीला बेबी गर्ल झाली!!!! मला खूप जास्त आनंद झाला आहे. बाळाच्या आई-बाबांचे अभिनंदन. नताशा आणि वरूण तुम्हाला खूप सारं प्रेम.”

तर अर्जुन कपूरनेदेखील इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत आपल्या मित्राचं अभिनंदन केलं. अर्जुनने लिहिलं, “बेबी जॉनला मुलगी झाली आहे. बाबा नंबर १चं कास्टिंग शेवटी लॉक झालं आहे. नताशा आणि वरुण तुमचं खूप अभिनंदन.”

हेही वाचा… दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या घरी राहायला आली अदा शर्मा; म्हणाली, “मला सकारात्मक…”

काल पहिल्यांदाच ही आनंदाची बातमी वरुणचे बाबा आणि बाळाचे आजोबा डेव्हिड धवन यांनी सगळ्यांना दिली. रुग्णालयातून बाहेर पडताना डेव्हिड धवन यांनी पापाराझींना सांगितलं की, वरुण आणि नताशाला गोंडस मुलगी झाली आहे.

दरम्यान, वरुण आणि नताशा यांनी २४ जानेवारी २०२१ रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या तीन वर्षांनंतर या कपलने फेब्रुवारीमध्ये एक खास फोटो शेअर करत नताशाच्या प्रग्नेन्सीची गुड न्यूज चाहत्यांना दिली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varun dhawan shared video of announcing baby girl birth good news dvr