Bollywood Christmas Day Celebration : बॉलीवूड सेलिब्रिटी ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत आहेत. काही सेलिब्रिटी यावर्षी आई-बाबा झाले, त्यांनी आपल्या बाळांबरोबर पहिला ख्रिसमस साजरा केला. त्यांनी इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करून ख्रिसमस सेलिब्रेशनची झलक दाखवली. अभिनेता वरुण धवनने पहिल्यांदाच त्याच्या सहा महिन्यांच्या लेकीचा चेहरा दाखवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वरुण धवन आणि नताशा दलाल जून २०२४ मध्ये आई-बाबा झाले. त्यांनी ३ जून रोजी त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. त्यांना मुलगी झाली. त्यांच्या मुलीचं नाव लारा आहे. नताशा किंवा वरुणने मुलीचा फोटो आतापर्यंत शेअर केला नव्हता. ख्रिसमसच्या निमित्तानं पहिल्यांदाच त्यांनी लाराबरोबरचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. ‘मी विथ माय बेबीज. मेरी ख्रिसमस’ असं कॅप्शन देत वरुणनने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे.

हेही वाचा – “आपल्या सणांचे फोटो कधी टाकलेस…”, विचारणाऱ्या नेटकऱ्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचं स्पष्ट उत्तर; म्हणाला…

वरुणने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो व त्याची पत्नी नताशा दोघेही पोज देत आहे. नताशाने लाराला जवळ घेतलं आहे, तर वरुण त्याच्या पाळीव श्वानाला घेऊन बसला आहे. लाराने चेक्सचा फ्रॉक घातला आहे, पण तिचा चेहरा दिसत नाही. त्यांनी तिच्या चेहऱ्यावर लाल रंगाचा हार्ट इमोजी लावला आहे. वरुणनने शेअर केलेला हा फॅमिली फोटो खूपच चर्चेत आहे.

हेही वाचा –  “आमचा सांता जाऊन १९ वर्षे…”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्याची वडिलांच्या आठवणीत पोस्ट; म्हणाले, “पप्पा असताना…”

पाहा फोटो –

आई-बाबा झाल्यानंतरचा पहिला ख्रिसमस साजरा करणाऱ्यांमध्ये दीपिका पादुकोण व रणवीर सिंह यांच्या नावाचा समावेश आहे. त्यांनीही लेक दुआबरोबर ख्रिसमस साजरा केला. दीपिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर सेलिब्रेशनची पोस्ट केली आहे. तिने घरातील ख्रिसमस ट्रीचा फोटो पोस्ट केला आहे, ज्यावर दीपिका, रणवीर व दुआ अशी नावं लिहिली आहेत. रणवीर व दीपिका यांची लेक दुआ काही दिवसांनी चार महिन्यांची होईल. नुकताच त्यांनी पापाराझींना पार्टी देऊन लेकीचा चेहरा दाखवला.

हेही वाचा – ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्री झळकणार आता नव्या भूमिकेत, पोस्ट करत म्हणाली, “माझी नवी मालिका…”

पाहा दीपिकाची पोस्ट –

वरुण व नताशा, रणवीर व दीपिकाबरोबरच विकी कौशल- कतरिना कैफ, रणबीर कपूर- आलिया भट्ट, तृप्ती डिमरी, क्रिती सेनॉन व तिचा बॉयफ्रेंड कबीर बहिया, हृतिक रोशन व त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद यांनीही ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varun dhawan shares first photo of baby lara deepika padukone ranveer singh christmas celebration with dua see photos hrc