नुकताच बाबा झालेला अभिनेता वरुण धवन सध्या चर्चेत आहे. वरुणने नुकतीच चाहत्यांना एक गुड न्यूज दिली. त्याच्या आयुष्यात ३ जून २०२४ रोजी गोंडस मुलीचं आगमन झालं. अशातच वरुणचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत नेहमीप्रमाणे वरुण पापाराझींच्या घोळक्यात दिसतोय. अभिनेत्याने यावेळी लाल रंगाचं टी-शर्ट, भगव्या रंगाची शॉर्ट्स आणि निळ्या रंगाची टोपी घातलेली यात पाहायला मिळतेय. जीममधून बाहेर निघताच पापाराझी त्याचे फोटो काढतात. तेवढ्यात वरुणचं लक्ष एका पापाराझीकडे जातं. तो फोनवर बोलत असतो आणि त्याचे फोटो काढत असतो. हे बघून वरुण त्याला म्हणतो की, “एकतर तू माझे फोटो काढ किंवा फोनवर बोल” हे बोलून झाल्यावर वरुण कारमध्ये बसायला जातो आणि लगेच कारमधून उतरतो. उतरताच क्षणी वरुण त्या पापाराझीचा फोन खेचून घेतो आणि फोनवर असलेल्या व्यक्तीला म्हणतो की, “तो व्यस्त आहे.”
वरुणचा हा व्हिडीओ एका विरल भयानी या अकाउंटवरून व्हायरल झालाय. “कामाच्या वेळेस गर्लफ्रेंडशी बोलायचं नसतं,” असं कॅप्शन या व्हिडीओला दिलंय. वरुणचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी यावर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “ती किती नशीबवान असेल” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिल, “वरुण खूप मजेशीर आहे. मला त्याचा हा स्वभाव आवडतोय.”
वरुण-नताशाच्या आयुष्यात चिमुकलीचं आगमन झाल्यानंतर याची गोड बातमी पहिल्यांदा बाळाचे आजोबा डेव्हिड धवन यांनी दिली. रुग्णालयातून बाहेर पडताना डेव्हिड धवन यांनी पापाराझींना सांगितलं की, वरुण आणि नताशाला गोंडस मुलगी झाली आहे.
हेही वाचा… ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने नाकारलं चित्रपटाचं मानधन, म्हणाला, “मला निर्मात्याचं श्रेय…”
गुड न्यूज दिल्यानंतर वरुण धवनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. लेकीच्या आगमनानंतर इन्स्टाग्रामवर ग्राफिक व्हिडीओ शेअर करत वरुणने लिहिलं होतं, “आम्हाला मुलगी झाली आहे. आई आणि बाळासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।”
हेही वाचा… ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम ईशा केसकरने ‘पुष्पा-२’ च्या गाण्यात आणला ट्विस्ट, डान्स व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, वरुण आणि नताशा यांनी २४ जानेवारी २०२१ रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या तीन वर्षांनंतर या कपलने फेब्रुवारीमध्ये एक खास फोटो शेअर करत नताशाच्या प्रग्नेन्सीची गुड न्यूज चाहत्यांना दिली.
© IE Online Media Services (P) Ltd