बॉलीवूड स्टार वरुण धवन सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. वरुण आणि नताशा हे नुकतेच आई-बाबा झालेलं हे लोकप्रिय दाम्पत्य आहे. लवकरच ते एका नव्या वास्तूमध्ये राहायला जाणार आहेत.

वरुण धवन त्याच्या बायकोबरोबर २०१७ मध्ये विकत घेतलेल्या जुहू अपार्टमेंटमध्ये राहत होता. आता वरुण पत्नी आणि मुलीसह हृतिक रोशनच्या सध्याच्या घरात राहायला जाणार आहे. एचटी सिटीमधील एका रिपोर्टनुसार असं कळलं की, वरुण आणि नताशा हृतिकच्या घरी शिफ्ट होणार आहेत.

vasai municipal schools
“बजेट वाढवा पण शाळा सुरू करा”, स्नेहा दुबेंकडून पालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
Sunny Deol Confirms His Role in Ramayana
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात काम करण्याबाबत सनी देओलकडून भूमिका स्पष्ट; म्हणाला, “हा चित्रपट ‘अवतार’प्रमाणे…”

हेही वाचा… आमिर खानने नाकारला होता महेश कोठारेंचा ‘हा’ चित्रपट, किस्सा सांगत म्हणाले, “माझ्या डोक्यात वेड्यासारखा विचार…”

एका सूत्रानं एचटी सिटीला सांगितलं, “वरुण आणि नताशा त्यांच्या चिमुकल्या मुलीसह लवकरच नव्या घरी राहायला येणार आहेत. हे समुद्रासमोरील (Sea Face Apartment) अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमध्ये सध्या हृतिक रोशन राहतो. लवकरच हृतिक जुहू येथील दुसऱ्या अपार्टमेंटमध्ये राहायला जाणार आहे. या घरी शिफ्ट झाल्यानंतर सुपरस्टार अक्षय कुमार, निर्माता साजिद नाडियाडवाला हे वरुणचे शेजारी होणार आहेत.”

मॅजिक ब्रिक्सनुसार, हृतिक त्याच्या सी-फेसिंग घरासाठी दरमहा ८.५ लाख रुपये भाडे देतो. आता वरुण धवन लवकरच ते घर भाड्याने घेणार आहे.

३ जून २०२४ रोजी वरुण-नताशाच्या आयुष्यात चिमुकल्या मुलीचं आगमन झालं. त्याची गोड बातमी पहिल्यांदा बाळाचे आजोबा डेव्हिड धवन यांनी दिली. रुग्णालयातून बाहेर पडताना डेव्हिड धवन यांनी पापाराझींना सांगितलं की, वरुण आणि नताशाला गोंडस मुलगी झाली आहे.

हेही वाचा… ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम ईशा केसकरने ‘पुष्पा-२’ च्या गाण्यात आणला ट्विस्ट, डान्स व्हिडीओ व्हायरल

वरुण धवननं गुड न्यूज दिल्यानंतर त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. लेकीच्या आगमनानंतर इन्स्टाग्रामवर ग्राफिक व्हिडीओ शेअर करत वरुणनं लिहिलं होतं, “आम्हाला मुलगी झाली आहे. आई आणि बाळासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद! हरे राम हरे राम, राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।”

हेही वाचा… “ती खासदारच नाही पण…”, कंगना रणौतच्या श्रीमुखात देणाऱ्या कॉन्स्टेबलची अनुपम खेर यांनी केली कानउघडणी, म्हणाले…

दरम्यान, वरुण आणि नताशा यांनी २४ जानेवारी २०२१ रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या तीन वर्षांनंतर या दाम्पत्यानं फेब्रुवारीमध्ये सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करीत नताशाच्या प्रेग्नन्सीची गुड न्यूज चाहत्यांना दिली.

Story img Loader