Vashu Bhagnani-Netflix Controversy: चित्रपट निर्माते वाशू भगनानी त्यांच्या पूजा एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन कंपनीमुळे चर्चेत आहे. मागच्या काही महिन्यांत त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसने थकबाकी न दिल्याचे आरोप ‘मिशन राणीगंज’च्या दिग्दर्शकासह काही क्रू मेंबर्सनी केले होते. अशातच वाशू भगनानी यांनी नेटफ्लिक्स इंडियावर ४७.३७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. पण याप्रकरणी नेटफ्लिक्सचं म्हणणं वेगळंच आहे.

वाशू भगनानी हे बॉलीवूडमधील नावाजलेले चित्रपट निर्माते आहेत. जॅकी भगनानी त्यांचा मुलगा असून अभिनेत्री रकुल प्रित ही त्यांची सून आहे. आमदार धिरज देशमुख हे वाशू भगनानी यांचे जावई आहेत.

“…अन् आमिर खडकामागे जाऊन रडू लागला”; ट्विंकल खन्नाने सांगितला किस्सा, म्हणाली, “मी अक्षयबद्दल…”

वाशू भगनानी यांचा नेटफ्लिक्सवर आरोप काय?

इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, नेटफ्लिक्सने त्यांचे अलीकडे प्रदर्शित झालेले तीन चित्रपट ‘मिशन राणीगंज’, ‘हिरो नंबर १’ आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ बाबत फसवणूक केली आहे, असा दावा वाशू भगनानी यांनी केला आहे. अद्याप पैसे मिळाले नसल्याचं म्हणत त्यांनी लॉस गॅटोस प्रॉडक्शन सर्व्हिसेस इंडिया विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तसेच आर्थिक गुन्हे शाखेने EOW या प्रॉडक्शन हाऊसलाही समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे.

आर्याला घराबाहेर का काढलं? अखेर ‘बिग बॉस’च्या ‘बॉस’ने सोडलं मौन; म्हणाले, “वारंवार फुटेज तपासलं, चर्चा…”

नेटफ्लिक्सकडून स्पष्टीकरण

‘इकॉनॉमिक्स टाइम्स’च्या वृत्तानुसार नेटफ्लिक्सने या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. पूजा एंटरटेनमेंटकडे नेटफ्लिक्सचे पैसे थकले आहेत, असा दावा या ओटीटी कंपनीने केलाय. तसेच पूजा एंटरटेनमेंटकडून करण्यात आलेले सर्व दावे खोटे आहे, असं ओटीटी कंपनीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. “हे दावे पूर्णपणे खोटे आहेत. खरं तर पूजा एंटरटेनमेंटकडे नेटफ्लिक्सचे पैसे बाकी आहेत. आमच्याकडे भारतातील क्रिएटिव्ह कम्युनिटीशी भागीदारीचा मजबूत ट्रॅक रेकॉर्ड आहे आणि आम्ही अधिकाऱ्यांबरोबर मिळून हा वाद सोडवण्यासाठी काम करत आहोत,” असं नेटफ्लिक्सने म्हटलं आहे.

‘या’ दिग्गज अभिनेत्याने मांसाहारासाठी भाड्याने घेतलेलं घर, सचिन पिळगांवकर यांचा खुलासा; म्हणाले, “त्यांचे कुटुंबीय…”

दरम्यान, वाशू भगनानी, जॅकी भगनानी आणि अली अब्बास जफर यांच्यादरम्यान ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटाबाबत वाद सुरू आहे. अलीने अबू धाबीमध्ये ९.५० कोटी रुपयांची हेराफेरी केल्याचा आरोप भगनानी यांनी केला आहे, तर चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी ७.३० कोटी रुपये मिळाले नाहीत, असं अलीचं म्हणणं आहे. भगनानी यांनी यासंदर्भात तक्रारही दिली आहे.